Waterfall Ban In Goa: सत्तरीतील धबधब्यांवर आता 'नो एंट्री', वनखात्याचा पर्यटकांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय

Valpoi Waterfall Ban: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सत्तरी तालुक्यातील डोंगराळ भागात धोका निर्माण झालाय.
Waterfall Ban In Goa
Waterfall Ban In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सत्तरी तालुक्यातील डोंगराळ भागात धोका निर्माण झालाय. राज्यात अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडण्याच्या घटना समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून वन विभागानं सत्तरीतील सर्व प्रमुख धबधब्यांमध्ये प्रवेश करण्यावर तात्पुरती बंदी घातली आहे.

वन विभागाने जारी केलेल्या अधिकृत सूचनेनुसार, धबधब्यांवर प्रवेश करण्यास तसेच आंघोळीस परवानगी नाकारण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

Waterfall Ban In Goa
Goa Drugs Case: शिवोलीत ड्रग्ज माफियांचा पर्दाफाश, 22 लाखांचे ड्रग्ज जप्त; केरळच्या तरुणाला अटक

सत्तरीतील शेळपे, करंझोळ, कुमठोळ, चरावणे, हिवरे, सालेली हे धबधबे पर्यटकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहेत. याठिकाणी सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते.

मात्र, गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या धबधब्यांच्या प्रवाहात अचानक वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रवाहाबरोबर मोठमोठे दगड, झाडं आणि माती वाहून येण्याचा धोका असल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं वन विभागानं स्पष्ट केलं आहे

धबधब्यांच्या ठिकाणी पावसाळ्यात धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळं नागरिकांनी धबधब्यांकडे जाणे टाळावे. नियमांचं उल्लंघन केल्यास आम्ही कायदेशीर कारवाई करू, असं वन खात्यानं सांगितलं आहे.

Waterfall Ban In Goa
Goa Crime: उत्तर गोव्यात 135 अट्टल गुन्हेगार! पडताळणी मोहिमेत 11 सराईतांचा यादीत समावेश; 1648 व्यक्तींना अटक

सध्या संपूर्ण सत्तरी तालुक्यात वातावरण ढगाळ असून, हवामान विभागाकडून पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com