Salaulim Dam News
Salaulim Dam OverflowDainik Gomantak

Goa Water Supply: गोमंतकीयांसाठी आनंदाची बातमी! राज्यात नवे 7 जलप्रकल्प राहणार उभे; 913 एमएलडी पाणी मिळणार

Water Supply In Goa: पाणीपुरवठा खात्‍याकडून राज्‍याच्‍या विविध भागांत जे सात जलप्रक्रिया प्रकल्‍प सुरू आहेत, त्‍यातून अतिरिक्त २६३ एमएलडी पाण्‍यावर प्रक्रिया केली जाणार आहे.
Published on

पणजी: पाणीपुरवठा खात्‍याकडून राज्‍याच्‍या विविध भागांत जे सात जलप्रक्रिया प्रकल्‍प सुरू आहेत, त्‍यातून अतिरिक्त २६३ एमएलडी पाण्‍यावर प्रक्रिया केली जाणार आहे. त्‍यामुळे वर्षभरात राज्‍यातील जनतेला प्रत्‍येक दिवशी ९१३ एमएलडी पाणी मिळेल, अशी माहिती खात्याचे मुख्य अभियंता सुभाष बेळगावकर यांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली.

राज्‍याला सध्‍या दरदिवशी ६५० एमएलडी पाण्‍याची गरज भासते. त्‍यात सरकारकडून अनेक भागांमध्‍ये नवनव्‍या प्रकल्‍पांना मान्‍यता देण्‍यात येत असल्‍यामुळे भविष्‍यात मोठ्या प्रमाणात पाण्‍याची गरज भासणार आहे. याचा विचार करूनच सरकारने सात ठिकाणी नवे जलप्रकल्‍प उभारण्‍यास सुरवात केली आहे. पुढील वर्षभरात हे सर्व प्रकल्‍प पूर्ण करण्‍यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे.

Salaulim Dam News
Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

नवे प्रकल्‍प (एमएलडी)

साळावली (२) : १८०

तुये : ३०

गांजे : २५

मोर्ले : १५

मेणकुरे : १०

धारबांदोडा : ३

Salaulim Dam News
Tillari Dam: महाभारतात कर्णाने कवच कुंडले दान दिली; त्याचप्रमाणे 'तिळारी धरण' बांधताना जैवसंपदा संपली, निसर्गहानी झाली

‘तुये’ महिनाभरात

दक्षिण गोव्‍यात पाण्‍याची कमतरता नाही. परंतु उत्तर गोव्‍याच्‍या काही भागांत पाणीटंचाई जाणवते. त्‍यावर मात करण्‍यासाठीच तुये येथे ३० एमएलडी क्षमतेचा प्रकल्‍प उभारण्‍यात येत आहे. हा प्रकल्‍प महिनाभरात पूर्ण होईल. त्‍यानंतर उत्तर गोव्‍यातील पाण्‍याचा प्रश्‍न मिटेल, असे पाणीपुरवठा खात्याचे मुख्य अभियंता सुभाष बेळगावकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com