Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

Amthane Dam News: दरवर्षी साधारण जुलै महिन्यात ‘फुल्ल’ होणारे आमठाणे धरण यंदा मात्र भर पावसात कोरडे पडले आहे. सध्या या धरणात ५ टक्क्यांहून कमी जलसाठा असल्याचे दिसून येत आहे.
Amthane Dam
Amthane DamDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: दरवर्षी साधारण जुलै महिन्यात ‘फुल्ल’ होणारे आमठाणे धरण यंदा मात्र भर पावसात कोरडे पडले आहे. सध्या या धरणात ५ टक्क्यांहून कमी जलसाठा असल्याचे दिसून येत आहे. स्वयंचलित गेट बसविण्याचे काम धरणावर सुरू असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.

नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे धरणातील जलसाठा कमी झालेला नाही. तर धरणावर स्वयंचलित गेट बसविण्यात येत असून, या कामासाठी धरणातील जलसाठा खाली करावा लागला आहे.

सध्या पंपिंगद्वारे धरणात भरणारे पाणी बाहेर सोडण्यात येत आहे, अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे सध्या या धरणाचे सभोवतालचे पात्र पूर्णपणे कोरडे ठेवण्यात आले असून, सध्यातरी हे धरण की एखादे तळे, असा प्रश्न अनेकांना पडत आहे.

नैसर्गिक कारणामुळे एखादेवेळी ‘पाणीबाणी’ ओढवलीच, तर साळ बंधाऱ्यातून धरणात पाणी सोडण्याची व्यवस्थाही जलसंपदा खात्याने केली आहे. दुसऱ्याबाजूने यंदा मात्र या धरणावर वर्षा पर्यटन करता येणार नाही. साधारण चालू महिन्यापर्यंत गेट बसवण्याचे काम चालणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.

Amthane Dam
Goa Water Crisis: गोवावासीयांसमोर भीषण पाणीसंकट! राज्यात 62 MLD पाण्याची तूट; तक्रारींचा वाढला ओघ

वर्षा पर्यटनावर परिणाम

गेल्या काही वर्षांपासून आमठाणे धरण वर्षा पर्यटनासाठी प्रकाशझोतात आले आहे. खासकरून पावसाळ्यात पर्यटनाची मजा लुटण्यासाठी स्थानिकांसह देशी-विदेशी पर्यटक या धरणावर येतात.

सुट्टीच्या दिवसांत तर गर्दी दिसून येते. जलसाठा कमी करण्यात आल्यामुळे यंदा पावसाळ्यात या धरणावर वर्षा पर्यटन करायला मिळणार नाही.

सध्याची वस्तुस्थिती माहित नसल्यामुळे सध्या धरणावर काही पर्यटक येत असून, त्यांना नाराज होऊन परतावे लागत आहे.

Amthane Dam
Amthane Dam: चिंता मिटली! ‘आमठाणे’तील जलसाठ्यात वाढ; अवकाळी पाऊस ठरला उपयुक्त

धरणावर स्वयंचलित गेट बसविण्याचे काम सुरू

१ ‘आमठाणे’ बांधल्यापासून धरणाच्या गेटच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाले होते. गेल्या जानेवारीत कुडासे परिसरात ‘तिळारी’चा कालवा फुटल्यानंतर ‘तिळारी’तून गोव्याला पाणीपुरवठा बंद झाला होता. त्यामुळे उत्तर गोव्यात ‘पाणीबाणी’ निर्माण झाली होती.

२ आपत्कालीनवेळी आमठाणेतील पाणी अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पात सोडण्याची वेळ आली, तेव्हा धरणाची मुख्य ‘गेट’ उघडत नव्हती. ४ दिवस परिश्रम केल्यानंतर नौदलाच्या मदतीने ‘गेट’ उघडली. मात्र तोपर्यंत बार्देश तालुक्यातील जनतेचा ‘घसा’ कोरडा पडला होता.

३ या प्रकारानंतर जलस्रोत खात्याचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला होता. आपत्कालीनवेळी पुन्हा असा प्रसंग निर्माण होऊ नये. यासाठी आता धरणावर स्वयंचलित मुख्य गेट बसविण्यात येत आहे. सध्या हे काम हाती घेण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com