

पणजी: राज्याला सध्या दिवसाला ७०० एमएलडी पाण्याची गरज आहे. त्यापैकी ६३० एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जात आहे. उर्वरित पाण्याची गरज भागवण्यासाठी ३२५ एमएलडी क्षमतेचे प्रकल्प सुरू असून, ते सहा महिन्यांत पूर्ण होतील, अशी माहिती पाणीपुरवठा मंत्री सुभाष फळदेसाई यांनी मंगळवारी विधानसभा सभागृहात बोलताना दिली.
मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला आपल्या मतदारसंघातील पाणी टंचाईचा प्रश्न उपस्थित केला होता. मुरगाव मतदारसंघातील जनतेला पुरेसे पाणी मिळत नाही. त्याचा फटका बसत असल्याने स्थानिक वारंवार आपल्याकडे तक्रारी करीत आहेत.
मुरगाववासीयांना पुरसे पाणी देण्यासाठी पाणीपुरवठा खात्याने कोणत्या उपाययोजना आणि प्रकल्प हाती घेतले आहेत, असा प्रश्न आमदार आमोणकर यांनी उपस्थित केला होता. त्यावर मंत्री फळदेसाई म्हणाले की, मुरगाव तालुक्याला दररोज एकूण ८१ एमएलडी पाण्याची गरज भासते. त्यातील ६० ते ७० एमएलडी पाणी दररोज पुरवले जाते.
मुरगावचा काही भाग भौगोलिकदृष्ट्या उंचावर असल्याने पाणी पोहोचवताना तांत्रिक अडचणी येतात. तांत्रिक बिघाडामुळेच काहीवेळा पाणीपुरवठा खंडित होत असतो.
परंतु, मुरगावसह दक्षिण गोव्यातील अनेक गावांतील जनतेचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी ४४३ कोटी रुपये खर्चून जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला जात आहे. हा प्रकल्प अंतिम टप्प्यात असून, तो कार्यान्वित झाल्यानंतर मुरगावातील जनतेला पुरेसे पाणी मिळेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.