groundwater overuse
groundwater overuseDainik Gomantak

Goa Water Crisis: चिंताजनक!! गोव्यात पाणी टंचाई होणार? 40 टक्क्यांपेक्षा जास्त भूजलाच्या वापरामुळे भविष्य धोक्यात

Goa Groundwater Depletion: भूजलसाठा कमी असण्यामध्ये गोवा सिक्कीमच्या मागोमागे आहे
Published on

गोवा: केंद्रीय भूजल मंडळाने जाहीर केलेल्या एका अहवालानुसार गोव्यातील भूजलाचा साठा कमी होण्याच्या मार्गावर आहे. इतर राज्यांच्या तुलनेत गोव्याजवळ असलेला पिण्याच्या पाण्याचा साठा उत्तम असला तरीही राज्याजवळ असलेला भूजलाचा साठा येणाऱ्या काळात चिंता निर्माण करण्याची शक्यता आहे. भूजलसाठा कमी असण्यामध्ये गोवा सिक्कीमच्या मागोमागे आहे.

अहवालात सादर केलेल्या माहितीनुसार गोव्यात सध्या ४० टक्क्यांपेक्षा जास्त भूजल वापरासाठी काढले जातेय आणि म्हणूनच काही मर्यादित साठा बाकी राहिला आहे. वापरासाठी अधिकाधिक पाण्याचा वापर आणि भूजलाची पातळी दिवसेंदिवस कमी होणं हे गोव्याच्या भविष्यासाठी चांगलं नाही.

groundwater overuse
Ground water Contamination: भूजल प्रदूषित केल्यास १० लाखांचा दंड!!

गोव्यात यंदाच्या वर्षी मुबलक पाऊस झाला, मात्र तरीही भूजल पुनर्भरण आणि पाणी काढता येण्याजोग्या स्त्रोतांमध्ये घट झाली आहे आणि याचे प्रमुख कारण घरगुती, औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातील वाढती मागणी असण्याची शक्यता आहे.

या अहवालामधून तातडीने भूजलाचा साठा वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज अधोरेखित करण्यात आलीये. येणाऱ्या काळात राज्याला मुबलक प्रमाणात पाणी मिळावं म्हणून आताच काही शाश्वत पद्धतींकडे वळण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग तंत्राची अंमलबजावणी करणे किंवा सिंचन पद्धतींना चालना देणाऱ्या पद्धतींचा अवलंब केला जाऊ शकतो. शिवाय भूजलाच्या वापराबाबत नियम कठोर करण्याची गरज निर्माण होत असल्याचे चित्र समोर आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com