Ground water Contamination: भूजल प्रदूषित केल्यास १० लाखांचा दंड!!

Ground Water Contamination Penalty: भूजल दूषित केल्याबद्दल दोषी आढळल्यास १० लाख रुपयांपर्यंत दंड
Ground Water Contamination
Ground Water Contamination Dainik Gomantak
Published on
Updated on

Panjim,Goa

पणजी: गोवा राज्य सरकारकडून भूजल संसाधने वाचवण्यासाठी काही ठोस पाऊले उचलली गेली आहेत.

गोवा भूजल कायद्यात काही बदल करत बुधवारी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये प्रदूषण करणाऱ्या दोषींना कठोर दंड देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

Ground Water Contamination
Mandrem Ground Issue: मांद्रे गावाला मैदान देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सरकारच्या आदेशावरून भूजलाचे प्रदूषणापासून संरक्षण करण्यासाठी नवीन नियमानुसार भूगर्भातील जलचरांमध्ये घाण पाणी टाकून भूजल दूषित केल्याबद्दल दोषी आढळल्यास १० लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येईल.

याव्यतिरिक्त सरकारच्या परवानगीशिवाय खोदलेल्या विहिरी बुजवल्या जातील आणि या प्रक्रियेसाठी लागणार सर्व खर्च सदर व्यक्तीकडून वसूल करण्यात येईल. तसेच सरकारी अधिकाऱ्यांच्या कामत व्यत्यय आणू पाहणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com