साकोर्डा भागातील बट्टर येथे आज दुपारी पाण्याचा एक टँकर दाखल होऊन पाण्याचे वितरण करत होता. गावची लोकसंख्या तुलनेने अधिक असल्याने टँकरचे पाणी कमी पडले. निदान गावात दोन तरी टँकरने खेपा मारून पाणी पुरवठा करावा, अशी मागणी लोकांनी केली आहे.
मधलावाडा-साकोर्डा येथील ग्रामस्थांनी शनिवारी सकाळी विहिरीचे पाणी आटत असल्याचे कारण पुढे करून अचानक पाणी प्रकल्प बंद करण्यासाठी आक्रमक पावित्रा घेतला. यामुळे धारबांदोडा येथील पाणी विभागाचे कनिष्ठ अभियंत्याने प्रकल्प परिसरातील संतप्त ग्रामस्थांसमोर नमते घेऊन विहिरीतील पाणी खेचणारे पंप बंद करण्याचा निर्णय घेतला.
यामुळे या पाणी प्रकल्पावर अवलंबून असलेल्या लोकांची प्रचंड गैरसोय झाली. पेयजलासाठी लोकांना दाही दिशा वणवण करावी लागली होती. रविवारी रात्री ८.३० वा.पाण्याचा एक टँकर येऊन सुर्ला, मधलावाडा व बोळकर्णेतील काही मोजक्याच लोकांना पाणी देऊन पसार झाला.
‘बट्टर, तयडे, मेस्तवाडा, बोरीयाळ व धारगे गावात जादा टँकर उपलब्ध करून पाणी पुरवठा करणार आहे. याद्वारे पाण्याची समस्या काही अंशी सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.
- देविदास बोरकर, साहाय्यक अभियंता- धारबांदोडा.
जलवाहिनी पुन्हा जोडली
मधलावाडा येथील पाण्याचा प्रकल्प सुरू करून सुर्ला, मधलावाडा, बोळकर्णे गावातील लोकांना पाणी पुरवठा केला होता.
त्यानंतर पानसी येथील ग्रामीण पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी बोळकर्णे येथे निकामी करून पाणी पुरवठा बंद केला होता. बंद केलेला पाणी पुरवठा आज सकाळी कामगारांनी परत जोडून सदर गावांना पाणी पुरवठा करण्यात आल्याने लोकांनी समाधान व्यक्त केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.