Goa Waste To Energy: साळगाव, काकोडा प्रकल्‍प: कचऱ्यापासून 6.09 कोटी युनिट विजेची निर्मिती! दरदिवशी 880 टन कचऱ्यावर प्रक्रिया

Saligao Waste Treatment Plant: राज्‍यातील साळगाव आणि काकोडा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्‍पांतून गेल्‍या दहा वर्षांत सुमारे ६.०९ कोटी युनिट विजेची निर्मिती करण्‍यात सरकारला यश आले आहे.
Saligao Waste Treatment Plant
Goa Waste To EnergyDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्‍यातील साळगाव आणि काकोडा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्‍पांतून गेल्‍या दहा वर्षांत सुमारे ६.०९ कोटी युनिट विजेची निर्मिती करण्‍यात सरकारला यश आले आहे. या प्रकल्‍पांमध्‍ये दररोज ८८० टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असल्‍याचे राज्‍य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वरिष्‍ठ पर्यावरणीय अभियंते संजीव जोगळेकर यांनी ‘गोमंतकीय वास्तुकला आणि शाश्वतता’ या विषयावर झालेल्‍या राष्ट्रीय परिषदेत सादर केलेल्‍या अहवालातून समोर आले आहे.

१५.८ लाख स्‍थानिक आणि दरवर्षी राज्‍याला भेट देणाऱ्या सुमारे ९० लाख पर्यटकांकडून जो कचरा तयार होतो, त्‍यातील ८८० टन कचऱ्यावर दररोज साळगाव, काकोडा येथील मनोहर पर्रीकर एकात्‍मिक घनकचरा व्‍यवस्‍थापन सुविधा प्रकल्‍पात प्रक्रिया करण्‍यात येते.

Saligao Waste Treatment Plant
मडगावात कचरा व्यवस्थापनावर दरदिवशी होतोय दीड लाख खर्च, दरमहा 44 लाखांचा खर्च; दररोज 60 टन कचऱ्याचे संकलन

त्‍यात साळगाव येथील प्रकल्‍पात गेल्‍या दहा वर्षांपासून, तर काकोडा येथील प्रकल्‍पात गेल्‍या तीन वर्षांपासून कचऱ्यावर प्रक्रिया करून विजेची निर्मिती केली जात आहे. या दहा वर्षांच्‍या कालावधीत साळगाव प्रकल्पातून सुमारे ५.०६ कोटी, तर काकोडा प्रकल्‍पांतून सुमारे १.०३ कोटी असे मिळून ६.०९ कोटी युनिट विजेची निर्मिती केल्‍याचे अहवालात म्‍हटले आहे.

कोणता कचरा किती टक्‍के होतो जमा?

ओला कचरा : ५२ टक्‍के

सुका कचरा : ४५ टक्‍के

धोकादायक कचरा : ३ टक्‍के

१० वर्षांतील कचरा

Saligao Waste Treatment Plant
Saligao Waste Plant: पर्यटन पट्ट्यात दुर्गंधीचे साम्राज्य! साळगाव कचरा प्रकल्पाच्या ढिसाळ कारभाराचे वास्तव चव्हाट्यावर; मायकल लोबोंनी व्यक्त केली चिंता

प्रक्रिया व फायदे

साळगाव प्रकल्‍प (दहा वर्षे)

प्रक्रिया : ६.४८ लाख टन

सुका कचरा : सुमारे २.८३ लाख टन

ओला कचरा : सुमारे ३.२५ लाख टन

वीज निर्मिती : ५.०६ कोटी युनिट

बायोगॅस : १८,७५० घनमीटर

मनोहर पर्रीकर एकात्‍मिक

घनकचरा व्‍यवस्‍थापन, काकोडा

(तीन वर्षे)

प्रक्रिया : ७८,८५५ टन

सुका कचरा : २५,६२९ टन

ओला कचरा : ५३,२२६ टन

वीज निर्मिती : सुमारे १.०३ कोटी युनिट

बायोगॅस : सुमारे ५६.६८ क्‍युबिक मीटर

सिमेंट कारखान्‍यांसाठी वापर : २२,५५४ टन

खते : २ टन प्रतिदिवस

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com