मडगावात कचरा व्यवस्थापनावर दरदिवशी होतोय दीड लाख खर्च, दरमहा 44 लाखांचा खर्च; दररोज 60 टन कचऱ्याचे संकलन

Margao garbage management expenditure: मडगाव पालिकेकडे कचरा प्रक्रिया प्रकल्प नसतानाही कचरा व्यवस्थापनावर दरमहा सुमारे ४४ लाख रुपये खर्च होत असल्याचे समोर आले आहे.
Margao garbage management expenditure
Margao garbage management expenditureDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: मडगाव पालिकेकडे कचरा प्रक्रिया प्रकल्प नसतानाही कचरा व्यवस्थापनावर दरमहा सुमारे ४४ लाख रुपये खर्च होत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये ३० लाख रुपये मडगाव व फातोर्डा परिसरात दारोदार कचरा संकलन करणाऱ्या कंत्राटदाराला आणि १४ लाख रुपये काकोडा कचरा वाहतुकीसाठी खर्च केले जातात. त्यामुळे पालिकेला दररोज केवळ कचरा व्यवस्थापनावर सुमारे १.४६ लाख रुपये खर्च करावा लागतो, असा निष्कर्ष निघतो.

मडगावात दररोज सुमारे ४० टन ओला आणि १५ ते २० टन सुका कचरा संकलित केला जातो. पालिकेकडून केवळ कचरा व्यवस्थापनावर इतका मोठा खर्च होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कचरा व्यवस्थापनासाठी पूर्ण क्षमतेचा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करण्यात पालिकेला अपयश आल्याचे नागरिकांचे मत आहे.

Margao garbage management expenditure
Goa Congress: 'काँग्रेस'कडे 2027 साठी नक्की काय प्लॅनिंग आहे? गिरीश चोडणकर 'भाजप'चे तगडे आव्हान कसे पेलणार?

अभ्यास करून समस्या सोडविण्याचा प्रयत्न : प्रशासक

पालिका मंडळाचा कार्यकाळ संपल्याने सध्या पालिकेचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे. त्यामुळे नागरिकांकडून प्रशासकांकडून योग्य उपाययोजनांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

यापुढे काकोडा प्रकल्पात कचरा स्वीकारण्याबाबत शंकाच असल्याचे माजी नगराध्यक्ष सावियो कुतिन्हो यांनी मत व्यक्त केले.

Margao garbage management expenditure
Goa Schools Reopening: उन्हाळी सुट्टीनंतर परत वाजली शाळांची घंटा! डिचोलीतील शाळांत 95 टक्क्यांहून अधिक उपस्थिती; नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण

अलीकडेच पालिकेने १० टन क्षमतेचा प्रकल्प ७.३० कोटी रुपये खर्चून कार्यान्वित केला आहे. मात्र, त्याचा १०० टक्के उपयोग होताना दिसत नाही. या प्रकल्पात ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याचेही निदर्शनास आले आहे.

प्रशासक श्रीनेत कोठवाले यांनी सांगितले की, या संपूर्ण प्रक्रियेचा अभ्यास करून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com