Goa: फुकट पाणी देण्याऐवजी नोकऱ्या द्या - एल्विस गोम्स

मोफत पाणी ही सरकारची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक (Goa)
Congress Leader Elvis Gomez (Goa)
Congress Leader Elvis Gomez (Goa)Dainik Gomantak
Published on
Updated on

Margao: 16 हजार लिटर मोफत पाणी (16000 Ltr Free Water) ही सरकारची घोषणा निव्वळ धूळफेक असून असे मोफत पाणी देण्याऐवजी घरटी एक नोकरी देऊन लोकांना आर्थिक संकटातून बाहेर काढावे अशी मागणी काँग्रेस नेते एल्विस गोम्स (Congress Leader Elvis Gomez) यांनी केली आहे. लोकांना मोफत पाण्याची गरज नाही रोजगाराची गरज आहे. मोफत पाणी हा आणखी एक निवडणूक जुमला (Falsehood) असून जरी हे पाणी मिळाले तरी सामान्य लोकांना दर महिना 61 रुपयांपेक्षा अधिक फायदा होणार नाही असे गोम्स यांनी म्हटले आहे. (Goa)

Congress Leader Elvis Gomez (Goa)
Goa: दुहेरी ट्रॅकसाठी कासावली येथील खांबांची बेकायदा उभारणी रोखली

गोव्यात जे लोक दर महिन्याला सरासरी 27,000 लिटर पाणी वापरतात. दर दिवशी हे प्रमाण 900 लिटर पडते. राज्यात कोविडमुळे लोकांची आर्थिक कोंडी झाली होती त्यावेळी सरकारने पाणी शुल्कात 70 टक्के तर नवीन जोडणी घेण्यासाठी 100 शुल्कवाढ केली. हे दर वाढविण्यापूर्वी या सरासरी पाण्याच्या वापराचे बिल 146 रुपये यायचे ते आता 256 रुपये येणार त्यात 16 युनीटची सूट पकडल्यास हे बिल आता 195 रुपये होईल. त्यामुळे प्रत्यक्षात लोकांना फक्त 61 रुपयांचाच फायदा होणार. भाजपने ही खरी गोष्ट लोकांना सांगावी असे गोम्स यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com