हाच का अंत्योदय? वेर्ण्यात भर पावसात 40 वर्षे जुने घर जमीनदोस्‍त करत गरोदर महिलेसह अल्‍पवयीन मुलगीला केलंय बेघर

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन: पूर्वकल्पना न देता घर पाडले; काँग्रेस आक्रमक
Vijai Sardesai
Vijai Sardesai Dainik Gomantak

House Demolition In Goa: वेर्णा येथील एका एसटी समाजातील महिलेच्या कुटुंबाचे घर पाडण्‍याच्‍या कृत्‍याचा प्रदेश काँग्रेस कमिटीने तीव्र निषेध केला आहे. याबाबत काँग्रेसच्‍या शिष्‍टमंडळाने अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी श्रीनेत कोठावळे यांची भेट घेऊन संबंधित कुटुंबाला न्‍याय मिळवून देण्‍याची मागणी केली.

वेर्णा येथील अनुसूचित जमाती समाजातील महिलेचे घर पाडल्‍याने ती बेघर झाली आहे. पावसाळ्यात एखाद्या कुटुंबाचे घर पाडण्‍याचा प्रकार अमानुष आहे. ज्‍या कुटुंबाचे घर ७ सप्‍टेंबर रोजी उद्ध्‍वस्‍त झाले ते कुटुंब बेघर झाले.

Vijai Sardesai
Yuva Scientist Award 2023: मनोहर पर्रीकर युवा वैज्ञानिक पुरस्कार अर्जासाठी मुदतवाढ, असे करा अप्लाय

त्‍यांची परिस्‍थिती भ्रष्‍ट सरकारच्‍या प्रशासनाच्‍या निर्दयी आणि अमानवी कृत्‍याचे प्रतिबिंब आहे, असे काँग्रेसने अतिरिक्‍त जिल्‍हाधिकाऱ्यांना दिलेल्‍या निवेदनात म्‍हटले आहे.

संबंधित कुटुंबाला पर्यायी व्‍यवस्‍था करण्‍यासाठी पुरेसा वेळ का देण्‍यात आला नाही? घर पाडण्‍यासंबंधीची माहिती पंचायतीला का देण्‍यात आली नाही? पावसाळा संपेपर्यंत काम स्‍थगित ठेवले असते तर आभाळ कोसळले असते का? असे अनेक प्रश्न यावेळी उपस्‍थित करण्‍यात आले.

यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सरकारवर टीका करत सध्‍याचे सरकार सामान्‍य जनतेविरोधात असल्‍याचे सांगितले.

संबंधित कुटुंब आर्थिकदृष्‍ट्या मागासलेले असून ते एसटी समाजाचे आहे हे माहीत असूनही कुटुंबाच्‍या निवाऱ्यासाठी पर्यायी व्‍यवस्‍था करण्‍यासाठी प्रशासनाने राज्‍य एसटी आयाेगाला का कळविले नाही, अशी विचारणाही यावेळी करण्‍यात आली.

अतिरिक्‍त जिल्‍हाधिकाऱ्यांनी हे बांधकाम कोमुनिदाद कडून पाडण्‍यात आल्‍याचे सांगितले. संबंधित महिलेला माणुसकीच्‍या भावनेतून मदत करण्‍याचे आश्‍वासन त्‍यांनी शिष्‍टमंडळाला दिले.

Vijai Sardesai
Accident Death : सिडनीचा मृतदेह भावाकडे सुपूर्द, नातेवाईकांचा प्रशासनावर रोष

हाच काय तो, तुमचा अंत्योदय ?

या घटनेचा तीव्र निषेध करताना ‘गोवा फॉरवर्ड’चे अध्यक्ष विजय सरदेसाई हेच का तुमचे ‘अंत्योदय तत्व’ असा सवाल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना केला आहे.

एका बाजूने कोमुनिदादच्या जमिनी हडप करून त्यावर झोपडपट्ट्या उभारणाऱ्या बिगर गोमंतकीयांना सोयीचे व्हावे यासाठी हे सरकार अशा झोपडपट्ट्यांना अभय देणारे कायदे आणते. आणि दुसऱ्या बाजूने नीज गोंयकरांवर असा अन्याय करते.

हे सरकार सामान्यांचे हित जपणारे नसून आपली मतपेटी कशी सुरक्षित राहील हे पाहणारे आहे, अशी प्रतिक्रिया सरदेसाई यांनी व्यक्त केली.

Vijai Sardesai
Gomantak Editorial: संवाद अन् सौदे

प्रतिमांचे आयोगाला साकडे

वेर्णा येथील कोमुनिदाद जागेत 40 वर्षे जुने घर जमीनदोस्‍त करण्‍यात आले आहे. त्‍यामुळे यामध्‍ये रहाणारे कास्‍तान कुटुंबीय बेघर झाले आहेत. त्‍यांचे तत्‍काळ पुनर्वसन करावे अशी मागणी प्रतिमा कुतिन्‍हो यांनी राज्‍य महिला आयोगाकडे केली आहे.

जे घर जमीनदोस्‍त केले आहे, त्‍यात एक गरोदर महिला तसेच अल्‍पवयीन मुलगी आपल्‍या कुटुंबासोबत रहात होती. मात्र, कुठलीही पूर्वकल्‍पना न देताच हे घर पाडले. त्‍यांचे पुनर्वसन सोडाच, पण आता स्‍थानिक आमदार तसेच संबंधित अधिकारी विषय झटकत असल्‍याचा आरोप त्‍यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com