अनमोडमधून गोव्यातील वाहनं परत पाठवली

आरटीपीसीआर चाचणी अहवाल नसल्याने माघारी परतण्याची नामुष्की
Anmod Checkpost
Anmod CheckpostDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : कर्नाटक राज्यात प्रवेशासाठी आरपीसीआर चाचणी गोव्यातील वाहनचालकांना चांगलीच महागात पडताना दिसत आहे. माजाळी चेकपोस्टवर झालेल्या अडवणुकीनंतर आता अनमोडच्या चेकपोस्टवरही गोव्यातील वाहनांना आटकाव केला जात आहे. (Anmod Checkpost News Update)

Anmod Checkpost
म्हापसा बसस्थानकाच्या कामावरुन मायकल-जोशुआमध्ये जुंपली

अनमोडमधून (Anmod Ghat) कर्नाटकमध्ये प्रवेशासाठी आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल अनिवार्य करण्यात आला आहे. मात्र तो अहवाल नसल्याने गोव्यातील अनेक वाहनचालकांना माघारी परतावं लागलं आहे. गुरुवारी अनमोड चेकपोस्टवर काहीकाळ तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. कर्नाटकमध्ये (Karnataka) प्रवेश न मिळाल्याने वाहनचालकांनी चांगलाच गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं. मात्र चेकपोस्टवरील अधिकाऱ्यांनीही नियमांवर बोट ठेवल्याने त्यांना माघारी परतावं लागलं.

Anmod Checkpost
मिलिंद नाईक यांच्याविरोधात काँग्रेस जाणार न्यायालयात

दरम्यान कारवारमध्ये प्रवेशापूर्वी लागणाऱ्या माजाळी चेकपोस्टवर गोव्यातील वाहनचालकांची अडवणूक गेले कित्येक दिवस सुरुच आहे. याच्या निषेधार्थ पोळे चेकपोस्टवर काँग्रेसतर्फे आंदोलन केलं होतं. काँग्रेसच्या (Congress) कार्यकर्त्यांनी आक्रमक होत कर्नाटकमधून येणारी वाहनं अडवण्याचा प्रयत्न केला होता, ज्यामुळे परीसरात काहीकाळ तणावाचं वातावरण होतं. कर्नाटकमध्ये प्रवेशासाठी कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्राची सक्ती करण्यात आली असली तरी गोव्यात प्रवेशासाठी असा कोणताही निकष नाही. त्यामुळे सीमेवरील चेकपोस्टवर सातत्याने तणाव पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com