Online Fraud: सायबर ठगांचा माजी IPS अधिकाऱ्याला विळखा! ऑनलाइन फ्रॉडमुळे स्वत:वर झाडली गोळी; सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासा

Retired Punjab IG Amar Singh Chahal: माजी आयजी (IG) अमर सिंह चहल यांनी पटियाला येथील आपल्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली.
Retired Punjab IG Amar Singh Chahal
Retired Punjab IG Amar Singh ChahalDainik Gomantak
Published on
Updated on

Online Fraud Case: पंजाब पोलीस दलातील एक अत्यंत वरिष्ठ आणि प्रभावशाली नाव असलेले माजी आयजी (IG) अमर सिंह चहल यांनी पटियाला येथील आपल्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेमुळे संपूर्ण पंजाबसह पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली. चहल यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे सायबर गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

ऑनलाइन फ्रॉडमुळे खचले होते मनोबल

पोलीस (Police) तपासादरम्यान घटनास्थळावरुन एक 'सुसाईड नोट' जप्त करण्यात आली आहे. या चिठ्ठीमध्ये अमर सिंह चहल यांनी आपल्या या कृत्याचे कारण स्पष्ट केले. त्यांच्यासोबत 'ऑनलाइन फ्रॉड' झाला असून त्यात त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या आर्थिक फसवणुकीमुळे आणि त्यामुळे निर्माण झालेल्या मानसिक त्रासामुळे आपण हे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी नमूद केले. आयजी सारख्या वरिष्ठ पदावरुन निवृत्त झालेल्या व्यक्तीलाही सायबर ठगांनी आपल्या जाळ्यात ओढल्याने पोलीस विभागालाही यावर विश्वास ठेवणे कठीण जात आहे.

Retired Punjab IG Amar Singh Chahal
Bicholim Online Fraud: 'इन्व्हेस्टमेंट'च्या नावाखाली फसवणूक! लाखोंचा गंडा घालणाऱ्या संशयिताला मध्यप्रदेशातून अटक; डिचोली पोलिसांची मोठी कारवाई

एसएसपींनी दिली अधिकृत माहिती

पटियालाचे एसएसपी वरुण शर्मा यांनी माहिती देताना सांगितले की, अमर सिंह चहल यांनी स्वतःवर गोळी झाडल्याची माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने त्यांच्या घरी पोहोचले. त्यावेळी ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून सध्या तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. मात्र, गोळी वर्मी लागल्याने त्यांची प्रकृती अजूनही नाजूक आहे.

Retired Punjab IG Amar Singh Chahal
Online Fraud: '..नामांकीत कंपनीचा अधिकारी बोलतोय'! 40 जणांना 'ऑनलाईन' गंडवले; 24 वर्षीय तरुणाला झारखंड येथे अटक

विवादास्पद पार्श्वभूमी

अमर सिंह चहल यांचे नाव केवळ या घटनेमुळेच नव्हे, तर 2015 च्या बहुचर्चित फरीदकोट गोळीबार प्रकरणातील आरोपी म्हणूनही चर्चेत होते. पंजाब पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (SIT) 2023 मध्ये या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल, सुखबीर सिंह बादल यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाचा समावेश होता, त्यात अमर सिंह चहल हे देखील एक आरोपी होते. या न्यायालयीन प्रकरणाचा दबाव आणि त्यातच झालेली आर्थिक फसवणूक यामुळे ते प्रचंड मानसिक तणावात असल्याची चर्चा आहे.

Retired Punjab IG Amar Singh Chahal
Goa Online Fraud: राज्यात भामट्यांचा उच्छाद! पोलिस अधिकारी असल्याचे भासवून महिलेला लाखोंचा गंडा?

पोलीस आता या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. त्यांच्या बँक खात्यांचे व्यवहार तपासले जात असून त्यांना कोणी आणि कसे फसवले याचा शोध घेतला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com