Goa Online Fraud: राज्यात भामट्यांचा उच्छाद! पोलिस अधिकारी असल्याचे भासवून महिलेला लाखोंचा गंडा?

Online Fraud Attempt Fatorda: पोलिस असल्याचे सांगून मोबाईलवर किंवा ऑनलाईन पद्धतीने फसवणूक करणाऱ्या भामट्यांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.
Online Fraud
Online Fraud Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: पोलिस असल्याचे सांगून मोबाईलवर किंवा ऑनलाईन पद्धतीने फसवणूक करणाऱ्या भामट्यांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यातच फातोर्डा येथील एका महिलेला आपण पोलिस अधिकारी असल्याचे सांगून लाखो रुपयांना टोपी घालण्याचा प्रयत्न एका भामट्याने मोबाईलवरून केला.

मात्र, या महिलेच्या जागरूकतेमुळे त्याचा प्रयत्न असफल ठरला. ही घटना फातोर्डा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. डोंगरवाडा-फातोर्डा येथील वैशाली भोसले यांनी याप्रकरणी फातोर्डा पोलिस स्थानकात १० डिसेंबर रोजी अज्ञात भामट्याविरोधात तक्रार नोंदविली आहे.

ही घटना फातोर्डा (Fatorda) पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. डोंगरवाडा-फातोर्डा येथील वैशाली भोसले यांनी याप्रकरणी फातोर्डा पोलिस स्थानकात १० डिसेंबर रोजी अज्ञात भामट्याविरोधात तक्रार नोंदविली आहे.

Online Fraud
Goa Online Frauds: ONGC मध्ये काम देण्‍याच्‍या बहाण्‍याने शेकडो युवकांना लाखाेंचा गंडा

अधिक माहिती अशी की, वैशाली भोसले यांच्याशी या भामट्याने व्हॉट्सॲपवरून (WhatsApp) कॉल करत संपर्क साधला. तुम्ही मनी लॉंड्रिंग तसेच भूबळकाव प्रकरणामध्ये सहभागी आहात, असे सांगून त्यांना घाबरविण्याचा प्रयत्न केला. हा भामटा दोन वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून त्यांना व्हॉटस ॲपवरून भोसले यांच्याशी संपर्क साधत होता. नंतर त्याने हे प्रकरण मिटविण्यासाठी मालाड (मुंबई) येथील फेडरल बँकेमध्ये २ लाख २० हजार ९६८ रुपये आपल्या खात्यात ट्रान्स्फर करण्यास सांगितले.

Online Fraud
Goa Online Frauds: चोरी, ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ; तीन घटनांमध्ये 20 लाखांहून अधिक रकमेचा गंडा

मात्र, भोसले यांनी सावध होऊन कोणताही आर्थिक व्यवहार न करता पोलिसांत तक्रार नोंदविली. पोलिसांनी कलम ३१८ (४), ३१९ (२) तसेच माहिती व तंत्रज्ञान कायद्याखाली हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. पोलिस निरीक्षक नॅथन आल्मेदा याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com