Goa University: पेपर फॉर लव्ह स्कॅम! कुलगुरूंना द्यावा लागणार राजीनामा? मेनन यांची सावध भूमिका

Goa University Paper Leak: 'चोरी करून प्रश्नपत्रिका फोडणारा प्राध्यापक केवळ तंबीने सुटला' अशा मथळ्याखालील प्रसिद्ध केलेल्य गोमन्तकमधील या वृत्ताने खळबळ उडाली आहे.
Goa University News
Goa UniversityDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सहकारी प्राध्यापकांच्या केबिनमध्ये घुसून प्रश्नपत्रिका चोरणाऱ्या साहाय्यक प्राध्यापकाला संरक्षण देण्याची सारी व्यूहरचना गोवा विद्यापीठाने आखली असून, कुलगुरू प्रा. हरिलाल मेनन यांनी आज (१७ मार्च) पत्रकार परिषदेत या प्रकरणी चक्क कानावर हात ठेवले.

"सदर साहाय्यक प्राध्यापक परवानगी न घेता आपल्या सहकारी प्राध्यापकांच्या कार्यालयांत स्वतःकडील चावी वापरून जरूर गेला होता. परंतु तो तेथे ठेवलेली रसायने घेण्यासाठी गेला होता. त्याने प्रश्नपत्रिका चोरल्याची कोणतीही तक्रार अद्याप आपल्याकडे आलेली नाही" असे कुलगुरू हरिलाल मेनन यांनी आज (१७ मार्च) बिनदिक्कतपणे सांगितले. तरीही या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमली असून, सदर साहाय्यक प्राध्यापक प्रणव नाईक याला चौकशीच्या काळासाठी निलंबित करण्यात आले आहे.

Goa University News
Goa University: प्रेमाचा मामला, पेपर फोडला; 'त्या' विवाहित प्राध्यापकाचं निलंबन

'गोमन्तक'ने रविवारच्या (ता. १६) अंकात 'चोरी करून प्रश्नपत्रिका फोडणारा प्राध्यापक केवळ तंबीने सुटला' अशा मथळ्याखालील वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर गोव्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे कुलगुरूंनाही राजीनामा द्यावा लागेल, अशी भीती आहे. त्यामुळे प्रा. मेनन सावध भूमिका घेत असल्याचे लपून राहत नाही. सूत्रांच्या मते सप्टेंबरमध्ये या प्रकरणाचा सुगावा लागल्यानंतर इतर प्राध्यापकांनी या साहाय्यक प्राध्यापकाला मुद्देमालासह पकडले होते.

त्यानंतर त्याची चौकशीही झाली व दोषी आढळल्यानंतर त्याच्या वैयक्तिक कर्मचारीविषयक गुणांकनाच्या फाईलमध्ये ताशेरे ओढण्यात आले. परंतु त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे विद्यापीठाने टाळले. कारण विद्यापीठावर शिंतोडे उडाले असते, शिवाय विद्यापीठाला नामांकन मिळविण्यातही अडचणी आल्या असत्या.

'गोमन्तक 'ला ही बातमी प्राप्त झाल्यानंतर भौतिकशास्त्र व उपयोजित विज्ञान विभागातील जबाबदार प्राध्यापकांशी संपर्क साधला. त्यांनी या प्रकरणाला दुजोरा दिल्यानंतरच आम्ही ही बातमी प्रसिद्ध केली. त्याचवेळी हे प्रकरण दडपण्यासाठी विद्यापीठातील ज्येष्ठांनी प्रयत्न केला होता, परंतु काही प्राध्यापकांनी अत्यंत ठोस भूमिका घेऊन साहाय्यक प्राध्यापकाला उघडे पाडले.

Goa University News
Goa Politics: काँग्रेसचा आमदार पक्षाला रामराम ठोकणार? 'हात' सोडून 'कमळ' घेणार हाती?

गोवा सरकारच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकरण शेकण्याची भीती लक्षात घेऊन त्या साहाय्यक प्राध्यापकाला वाचविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. दरम्यान, गोवा विद्यापीठातील या बजबजपुरीला सर्वच राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. आज सकाळपासून बहुतांश विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठात धडक देऊन कुलगुरूंना जाब विचारला. त्यात अभाविप, गोवा फॉरवर्ड विद्यार्थी संघटनेचा समावेश होता. काँग्रेसच्या एनएसयूआयने आगशी पोलिस स्थानकात याप्रकरणी तक्रार दाखल केली.

ठळक मुद्दे

१) साहाय्यक प्राध्यापक प्रणव नाईक यांचा रेकॉर्ड तपासण्याची मागणी विद्यार्थी संघटनेने केली. या प्रकरणानंतर जी कागदपत्रे तयार झाली, ती व नाईक यांची पर्सनल फाईल उघड करण्याची मागणी.

२) कुलगुरु हरिलाल मेनन यांची अरेरावी. भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापकांना प्रसारमाध्यमांशी न बोलण्याची सूचना

Goa University News
Mumbai-Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, परतीच्या प्रवासासाठी निघालेले चाकरमानी 'बेहाल'; ठिक-ठिकाणी चक्काजाम

३) विद्यार्थी संघटना कुलगुरूविरुद्ध आंदोलन छेडणार; हरिलाल मेनन यांच्या राजीनाम्याचा आग्रह धरणार

४) इतर प्राध्यापकांनी या प्रकाराला गंभीर आक्षेप घेतला होता. प्राध्यापकांच्या चर्चेत प्रश्नपत्रिका फुटल्याची चर्चाही झाली होती. ती चर्चा व तक्रार कुलसचिव व कुलगुरू यांच्यापर्यंत कशी काय गेली नाही? कुलगुरूंपर्यंत खरोखरच तक्रार गेली नाही की या प्रकरणावर पांघरून घालण्यासाठी ते हे सोंग वठवत आहेत, याचीही चौकशी करण्याची मागणी राजकीय पक्ष करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com