Goa Politics: काँग्रेसचा आमदार पक्षाला रामराम ठोकणार? 'हात' सोडून 'कमळ' घेणार हाती?

Goa Assembly Election 2027: आठ आमदारांंनी पक्षांतर करुन भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसकडे केवळ तीन आमदार शिल्लक आहेत.
Goa Congress MLA
Congress FlagDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा विधानसभेच्या निवडणुकीला अद्याप दोन वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. पण, राज्यात या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या हालचाली सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप, आम आदमी पक्षासह इतर पक्षांनी देखील राज्यात प्राथमिक चाचपणीस सुरुवात केलीय. अशात विद्यमान, माजी आमदार आणि इच्छुकांची विविध वक्तव्य समोर येतायेत. काहींनी पक्ष बदलण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. तर, काहींनी अद्याप कोणतेही वक्तव्य केले नाही. दरम्यान, काँग्रेसचा एक आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार का? याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे ११ आमदार निवडणून आले होते. दरम्यान, आठ आमदारांंनी पक्षांतर करुन भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसकडे केवळ तीन आमदार शिल्लक आहेत. यातील देखील एक आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार की काय? याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. हा आमदार दुसरा तिसरा कोणी नसून, केपेचे आमदार आल्टन डिकॉस्ता आहेत. नुकत्याचे केपे मतदारसंघात पार पडलेल्या एका कार्यक्रमात डिकॉस्ता यांनी मुख्यमंत्री सावंत यांचे कौतुक करत एक सूचक वक्तव्य केले.

Goa Congress MLA
Shivaji Maharaj Statue: चर्चसमोर उभारला छत्रपती शिवरायांचा पुतळा; सांगेत दिसले हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन ऐक्य

नाकेरी बेतुल येथे उभारण्यात आलेल्या नव्या ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच पार पडले. तीन कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या या कार्यालयाचे काम केवळ ११ महिन्यात पूर्ण झाले आहे. या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलताना केपेचे आमदार आल्टन डिकॉस्ता यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे कौतुक केले. तसेच, सरकारमध्ये नसताना एवढी कामे करत आहे. सरकारमध्ये असतो तर किती कामे केली असती? असे वक्तव्य आल्टन यांनी यावेळी बोलताना केले.

आल्टन यांच्या या वक्तव्यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला रामराम ठोकून ते भाजपमध्ये प्रवेश करणार का? अशा चर्चांना पेव फुटले आहे. पण, या चर्चा निराधार असल्याचा खुलासा खुद्द डिकॉस्ता यांनी केला आहे. "मुख्यमंत्री सावंत विकासकामाच्या निमित्ताने चर्चा करण्यासाठी माला शोधत होते. मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, असं वक्तव्य केलंच नाही. माझा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा कोणताच विचार नाही. असे असते तर यापूर्वीच मी भाजपमध्ये प्रवेश केला असता", असे डिकॉस्ता म्हणाले.

Goa Congress MLA
Uday Bhembre: 'जिंकले म्हणजे राज्य केलं असं नव्हे, गोव्यातील शिवशाहीबद्दल एकही इतिहासकार का सांगत नाही'; भेंब्रेंचा नवा Video

अपक्ष चंद्रकांत शेट्ये भाजपच्या वाटेवर

गेल्या काही दिवसांपूर्वी बी. एल. संतोष गोव्यात असताना अपक्ष आमदार चंद्रकांत शेट्ये यांनी त्यांची भेट घेतली. भाजपने संधी दिल्यास मी पक्षात प्रवेश करण्यास तयार असल्याची माहिती शेट्ये यांनी दिली. त्यामुळे शेट्ये यांनी स्वत: भाजपमध्ये प्रवेश करण्याचे भाष्य केल्याने, पक्ष त्यांना वेळेत प्रवेश देईलच यात फरासी शंका वाटत नाही, असे राजकीय जाणकार सांगतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com