Goa University: गोवा विद्यापीठाला NAAC कडून A+ ग्रेड! इतिहासात पहिल्यांदाच मिळाला हा मान, CM सावंतांनी केलं अभिनंदन

Goa University NAAC A+ Grad: गोवा विद्यापीठाने आपल्या शैक्षणिक आणि संशोधन कामगिरीच्या जोरावर राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदेकडून (NAAC) A+ ग्रेड मिळवला आहे.
Goa University
Goa UniversityDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा विद्यापीठाने आपल्या शैक्षणिक आणि संशोधन कामगिरीच्या जोरावर राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदेकडून (NAAC) A+ ग्रेड मिळवला आहे. विद्यापीठाच्या ४० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हा मानाचा बहुमान मिळाल्याने विद्यापीठात आणि राज्यात आनंदाचे वातावरण आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या ऐतिहासिक यशाबद्दल गोवा विद्यापीठाचे आणि कुलपतींचे मन:पूर्वक अभिनंदन केले. "गोवा सरकारने विद्यापीठाच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी नेहमीच सक्रिय पाठिंबा दिला आहे. हे यश शिक्षण क्षेत्रातील आमच्या प्रयत्नांना मिळालेली मान्यता आहे," असे मुख्यमंत्री म्हणाले.

NAAC च्या मूल्यांकन प्रक्रियेत शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन कार्य, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा, कौशल्य विकास, आणि व्यवस्थापन या सर्व बाबींचा विचार केला जातो. त्या सर्व निकषांवर गोवा विद्यापीठाने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

Goa University
Goa University: ना शिस्त, ना औचित्य, ना नियंत्रण! गोवा विद्यापीठाबद्दलची कठोर निरीक्षणे; हलगर्जीपणामुळे समितीही थक्क

दुसरीकडे मात्र, विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र व उपयोजित विज्ञान विभागात घडलेल्या पेपरफुटीच्या प्रकरणामुळे सध्या गोवा विद्यापीठ वादाच्या भोवऱ्यात आहे. साहाय्यक प्राध्यापक प्रणव नाईक यांनी बनावट चाव्यांच्या साहाय्याने सहकारी प्राध्यापकांच्या केबिनमधून प्रश्नपत्रिका चोरून ती आपल्या विद्यार्थिनी मैत्रिणीला दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकारावर राज्य सरकारने नेमलेल्या न्यायमूर्ती आर. एम. एस. खांडेपारकर यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने शिक्कामोर्तब केले असून, सहाय्यक प्रा. प्रणव नाईक यांच्यासह विभाग प्रमुख, रजिस्ट्रार व कुलगुरूंवरही चौकशी समितीने ठपका ठेवला आहे.

Goa University
Goa Theft: भरदिवसा मंगळसूत्र हिसकावले, आरोपी निघाला निलंबित पोलिस! गाडी क्रमांकही बनावट; युवकाच्या सतर्कतेमुळे अटक

चौकशी समितीने तीन महिन्यांच्या सखोल तपासानंतर आपला अहवाल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे सुपूर्द केला. अहवालात विद्यापीठातील प्रशासनाचा ढिसाळ कारभार, प्राध्यापकांची निष्काळजी वृत्ती व कुलगुरू हरिलाल मेनन यांचे बेजबाबदार वर्तन यावर तीव्र शब्दांत टीका करण्यात आली आहे.

प्रा. प्रणव नाईक यांनी निश्चितपणे पेपर फोडले असून, त्याचा हेतू विद्यार्थिनी स्नेहल हसोलकर हिला लाभ मिळवून देणे हा होता. भविष्यातही ते असेच प्रकार करण्याची शक्यता होती," असा स्पष्ट उल्लेख चौकशी अहवालात करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com