Ujjwala Scheme: 'उज्ज्वला'च्या अर्जांनी उडवली आमदारांची झोप! काही ठिकाणी मारामारीच्या घटना; त्रासामुळे नागरिकांची नाराजी

Goa Ujjwala Scheme: विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून जारी केलेली ‘गोवा उज्ज्वला योजना’ सत्ताधारी भाजप सरकारसाठी ‘बूमरॅंग’ ठरणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
Goa Ujjwala Scheme
Ujjwala SchemeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून जारी केलेली ‘गोवा उज्ज्वला योजना’ सत्ताधारी भाजप सरकारसाठी ‘बूमरॅंग’ ठरणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आपल्या आमदारांना प्रकाशझोतात आणण्यासाठी त्यांच्याकडून अर्ज घेण्याची सोय करण्यात आली आहे. मात्र, या अर्जांवरून काही ठिकाणी मारामारीचे प्रसंगही घडले आहेत.

दुसरीकडे, अर्ज सादर करताना नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे निर्माण झालेली नाराजी दूर करण्यासाठी मंत्री-आमदारांना नागरिकांच्या नाकदुऱ्या काढाव्या लागत असल्याचे चित्र आहे. गेल्या दोन दिवसांपासून या योजनेचे अर्ज मिळवण्यासाठी आमदारांच्या कार्यालयांबाहेर लागणाऱ्या लांबच लांब रांगा आमदारांसाठी तापदायक ठरत आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना ताटकळत राहावे लागत असल्याने त्याचा फटका आपल्यालाच बसेल काय, अशी चिंताही आमदारांना सतावू लागली आहे.

Goa Ujjwala Scheme
Goa Coastal Security: किनारी सुरक्षेला केंद्राकडून 'टॉप प्रायॉरिटी'! पुढील दोन वर्षांत गृह मंत्रालयाची मोठी मोहीम,अमली पदार्थांवरही 'फोकस'

त्यामुळेच आमदारांकडून कार्यालयात अर्ज सादर करण्यासाठी किंवा अर्ज घेण्यासाठी होणारी गर्दी थोपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आमदारांना आपल्या कार्यालयात अतिरिक्त कर्मचारीही बसवावे लागले आहेत. दरम्यान, नागरी पुरवठा खात्याने आज दिलेल्या माहितीनुसार, १० सप्टेंबर नंतरही अर्ज उपलब्ध करणे व स्वीकारणे सुरु ठेवले जाणार आहे.

कुंकळ्ळीच्या ‘फ्रीस्टाइल’चे पडसाद!

सरकारने सिलिंडर मोफत देण्याची घोषणा केल्यानंतर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी चक्क आपल्या कुंकळ्ळीतील कार्यालयातून अर्ज उपलब्ध करून देण्याचे पोस्टर जारी केले. गोवा भेटीवर आलेल्या प्रभारी माणिकरावांपर्यंतही ही बाब पोहोचवण्यात आली. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकरांना युरी यांची कृती पटली नसल्याची चर्चा होती. दरम्यान, अर्ज घेण्यासाठी आलेल्या दोन महिलांमध्ये युरी यांच्या कार्यालयातच ‘फ्रीस्टाइल’ हाणामारी झाल्याची चर्चा आहे.

Goa Ujjwala Scheme
Goa Mercedes Crash: आधी वडिलांना शिवीगाळ करत मारहाण, नंतर जीवघेणा अपघात; चालक विद्याधर प्रभूचा मर्सिडीज 'कार'नामा

या झटापटीत एका महिलेचे मंगळसूत्रही तुटल्याची माहिती सहप्रभारी डॉ. अंजलीताई यांच्यापर्यंत कुंकळ्ळीतील एका महिला कार्यकर्तीने पोहोचवली. अर्थात, संबंधितांकडून हे वृत्त नाकारले जाण्याची शक्यता आहे. मात्र, या हाणामारीचा व्हिडिओ एका युवा काँग्रेस कार्यकर्त्याने चित्रित केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पणजीत अर्जांची सहज उपलब्धता

तिसवाडीतील आमदार आणि मंत्र्यांच्या कार्यालयांत अर्ज उपलब्ध झाले आहेत. मात्र, पणजीत अर्ज घेण्यासाठी गर्दी होऊ नये म्हणून नगरसेवकांकडेच अर्जाची पीडीएफ फाइल पाठवण्यात आली आहे. त्यामुळे मोबाईलवर अर्ज उपलब्ध होत असल्याने त्याची छायांकित प्रत काढून, अर्ज भरून आणि आवश्यक कागदपत्रे जोडून महानगरपालिकेत सादर केली जात आहेत. सोमवारी सकाळी महानगरपालिकेत अर्ज सादर करण्यासाठी मोठी झुंबड उडाली होती. त्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र रांग न लावता त्यांनाही एकाच रांगेत उभे राहावे लागले.

Goa Ujjwala Scheme
Goa Politics: 'आमचे सरकार आणा, आम्ही तुम्हाला न्याय देऊ', मडगावात सरदेसाई, पाटकर, व्हेन्झी व्हिएगस एकत्र

गॅसधारकांच्याच खात्यावर पैसे जमा करायचे असतील, तर अर्ज भरण्याची गरजच काय? गॅस वितरकांकडे सर्व ग्राहकांची यादी उपलब्ध आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यावर सहज पैसे जमा करता आले असते. मात्र, त्रास सोसल्याशिवाय सहज काही मिळत नाही, हाच संदेश भाजप लोकांना देत असावा, असे दिसते.- गिरीश चोडणकर, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com