Goa Road Accident: उशीर झाला, पण न्याय मिळाला! बड्डे- मडगाव येथे रस्ता अपघातात मुलाचा मृत्यू, पालकांना मिळणार ३9 लाखांची भरपाई

Goa Road Accident Compensation: बड्डे - मडगाव येथील रस्ता अपघातात मृत पावलेल्या एका युवकाच्या पालकांना मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने ३९ लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश दिला
Goa Road Accident
Goa Road Accident CompensationDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: बड्डे - मडगाव येथील रस्ता अपघातात मृत पावलेल्या एका युवकाच्या पालकांना मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने ३९ लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश दिला. ५ डिसेंबर २०१७ रोजी बड्डे येथे अपघात होऊन इंझमाम शेख या एकोणीस वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या अपघात प्रकरणी त्याच्या पालकांना ३९,०४,३०० रुपये भरपाई देण्याचा आदेश राम प्रभुदेसाई यांच्या न्यायालयाने जारी केला.

मृत इंझमाम हा रोझरी महाविद्यालयाचा बीबीएचा विद्यार्थी होता आणि अर्धवेळ नोकरी करून कुटुंबाला हातभार लावत होता. ५ डिसेंबर रोजी रात्री ११.२० वाजण्याच्या सुमारास बड्डे येथील नॉर्बर्ट जीमजवळ हा अपघात घडला होता. संदीप होन्नावरकर याने आपली मोटारसायकल निष्काळजीपणे आणि चुकीच्या बाजूने चालवत समोरून येणाऱ्या दुचाकीला धडकली आहे.

Goa Road Accident
Bombay High Court: मुंबईची नोकरी सोडली, पण हक्काच्या घरातून बाहेर पडावे लागले, वडिलांच्या 9 खोल्यांच्या महालावर मुलाचा हक्क हायकोर्टाने नाकारला!

या अपघातात दुचाकीचालक इंझमाम शेख गंभीर जखमी झाला होता आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, तर स्कूटीवरील सहप्रवासी मेहरीन मुल्ला हिला किरकोळ दुखापत झाली होती. मृत इंझमाम यांचे वडील शेख महमद इक्बाल आणि आई मुमताज मुल्ला यांनी या अपघात प्रकरणी न्यायालयात दाद मागितली होती.

Goa Road Accident
Goa Sessions Court: कनिष्ठ न्यायालयाचा 'तो' निर्णय तर्कहीन; कारावासाची शिक्षा केली रद्द, रवींद्रनाथ गावकर दोषमुक्त

विमा कंपनीने केलेला आक्षेप फेटाळत न्यायालयाने मानले की, सदर युवक हुशार होता आणि त्याचे भविष्य उज्ज्वल होते. त्यामुळे न्यायालयाने सर्व बाजूंचा विचार करून नुकसान भरपाई, भविष्यातील संधी आणि इतर खर्चासह एकूण ३९ लाख ४ हजार ३०० रुपये संयुक्तपणे भरण्याचे आदेश वाहनचालक, मालक आणि बजाज अलायंझ जनरल इन्शुरन्स कंपनीला दिले आहेत. या रकमेवर अर्ज दाखल केल्याच्या तारखेपासून ६.८० टक्के दराने व्याजही द्यावे लागणार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com