Goa Taxi Drivers Protest: ॲप आधारित टॅक्सीसेवा काळानुरूप योग्यच! ट्रॅव्हल टुरिझम असोसिएशनचे जॅक सुखिजा यांचे आवाहन

Goa Taxi Drivers: सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन गोव्याच्या पर्यटन वाढीसाठी हा निर्णय घ्यावा लागेल, असे आवाहन
Goa Taxi Drivers: सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन गोव्याच्या पर्यटन वाढीसाठी हा निर्णय घ्यावा लागेल, असे आवाहन
Goa Taxi Driver Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Taxi Operators Protest

पणजी: आता सर्वच क्षेत्रांत तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. त्यामुळे गोव्याच्या वाहतूक व्यवस्थेत ॲप आधारित टॅक्सीसेवा काळानुरूप योग्यच आहे. सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन गोव्याच्या पर्यटन वाढीसाठी हा निर्णय घ्यावा लागेल, असे आवाहन ट्रॅव्हल टुरिझम असोसिएशन गोवाचे अध्यक्ष जॅक सुखिजा यांनी केले.

संघटनेच्या कार्यालयात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी संघटनेचे माजी अध्यक्ष नीलेश शहा आणि आकाश मडगावकर उपस्थित होते. सुखिजा म्हणाले की, तंत्रज्ञानाचा वापर केला नाही तर आम्ही पर्यटन क्षेत्रात मागे पडू. आज प्रत्येक व्यवसायात स्पर्धा आहेच. त्यामुळे आम्हाला ॲप नको, असे आम्ही म्हणू शकत नाही. ग्राहकाला हवी ती सुविधा वापरण्याचा अधिकार आहे. त्यामुळे ॲपआधारित टॅक्सीसेवा गरजेची आहे.

Goa Taxi Drivers: सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन गोव्याच्या पर्यटन वाढीसाठी हा निर्णय घ्यावा लागेल, असे आवाहन
Goa Taxi Operators Protest: आंदोलन चिघळलं, बैठकीतल्या एंट्रीवरून वाद, CM शी चर्चा न करताच शिष्टमंडळ माघारी

टॅक्सी सेवेबाबत पर्यटक असंतुष्ट

गोव्यात येणाऱ्या कोणत्याही पर्यटकाला विचारले तो सांंगेल की, गोव्यात सर्व काही चांगले आहे. परंतु टॅक्सीची समस्या आहे. पर्यटन व्यवसाय हा गोव्याचा आर्थिक कणा आहे. सुमारे ८ लाख नागरिकांची उपजीविका या व्यवसायावर अवलंबून आहे. टॅक्सी केवळ पर्यटकच वापरतात, असे नाही. स्थानिकही वापरतात. त्यामुळे ॲपआधारित सेवा सुरू झाली तर ती सर्वांनाच उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे या विषयावर गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे, असे नीलेश शहा यांनी सांगितले.

आज सर्वच क्षेत्रांत स्पर्धा आहे. येत्या काळात हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्याचा फायदा निश्‍चितपणे होणार आहे, हे टॅक्सी व्यावसायिकांनी समजून घ्यावे. गोव्यात टॅक्सीचालकांनी आंदोलन केले, ही बातमी ज्यावेळी सर्वत्र पसरते, त्यावेळी त्याचा परिणाम थेट पर्यटनावर होतो.

नीलेश शहा, माजी अध्यक्ष, टीटीएजी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com