Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Transport Minister Mauvin Godinho: राज्याचे परिवहनमंत्री मॉविन गुदिन्हो यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (22 नोव्हेंबर) राज्य रस्ता सुरक्षा परिषदेची बैठक पर्वरी येथे पार पडली.
 गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई
Transport Minister Mauvin GodinhoDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्याचे परिवहनमंत्री मॉविन गुदिन्हो यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (22 नोव्हेंबर) राज्य रस्ता सुरक्षा परिषदेची बैठक पर्वरी येथे पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. या बैठकीतच एक महत्त्वाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत अपघातग्रस्तांना भरपाई म्हणून 2 लाखांवरुन 10 लाख रुपये करण्याचा हा प्रस्ताव ठेवण्यात आला.

तसेच, रस्त्यावरील भटक्या गुरांचा बंदोबस्त करणे आणि रुग्णवाहिका सेवा वाढवण्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. अपघातांच्या प्राथमिक कारणांचे विश्लेषण करुन तात्काळ सुधारात्मक उपाययोजना राबवण्याचे निर्देशही परिवहनमंत्र्यांनी संबंधित विभागांना दिले.

 गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई
सहकार क्षेत्राच्या उन्नतीसाठी सरकार वचनबद्ध: मंत्री मॉविन गुदिन्हो

दुसरीकडे, मद्यपान करुन वाहन चालवणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. परिवहनमंत्र्यांनी अशाप्रकारे वाहने चालवणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले.

 गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई
Dabolim Airport : ‘दाबोळी’चा विस्तार होतोय; विमानतळ बंद पडणार नाही : माविन गुदिन्हो

याशिवाय, रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी लघुपट, जिंगल्स आणि प्रभावी मोहीम राबवण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला. पशुसंवर्धन विभागाला भटक्या गुरांच्या समस्या सोडवण्यासाठी प्लॅन सादर करण्याचेही निर्देश परिवहनमंत्र्यांकडून देण्यात आले.

गेल्या बैठकीपासूनची प्रगती स्पष्ट दिसत असली तरी बरेच काम बाकी आहे. मी सर्व विभागांना पुढील बैठकीसाठी कार्यवाही करण्यायोग्य उपाय आणि स्पष्ट रोडमॅप सादर करण्यास सांगितले आहे, असे गुदिन्हो म्हणाले. गोमंतकीयांसाठी रस्ते सुरक्षित करणे ही आमची जबाबदारी आहे, असेही ते शेवटी म्हणाले.

 गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई
Goa Government Job: घरबसल्या येईल सरकारी नोकरीचा कॉल; गोवा सरकारची भन्नाट योजना, अशी करा नोंदणी

दरम्यान, राज्यात रस्‍ते अपघातांची संख्‍या दिवसेंदिवस वाढत आहे. हे अपघात नियंत्रणात आणण्यासाठी विशिष्ट संख्येने रस्तावाहतूक सुरक्षाविषयक व्याखाने ऐकण्याची सक्ती केली पाहिजे, अशी मागणी गोवा रस्ता सुरक्षा मंचचे अध्यक्ष दिलीप नाईक यांनी पत्रकार परिषदेत यापूर्वी केली होती.

संयुक्त राष्ट्रांनी तयार केलेले ‘4-ई’ हे धोरण गोवा सरकारने (Goa Government) स्वीकारावे. कारण त्‍याद्वारे रस्तेअपघातांत बळी पडणाऱ्यांची संख्या निम्म्याने कमी होईल, असेही ते म्‍हणाले होते. यावेळी संजीव सरदेसाई आणि मंचचे अन्य सदस्य उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com