सहकार क्षेत्राच्या उन्नतीसाठी सरकार वचनबद्ध: मंत्री मॉविन गुदिन्हो

सहकार क्षेत्र (Cooperative sector) हे देशाच्या प्रगतीसाठी महत्वपुर्ण असुन केंद्र व राज्य सरकार (State Government) या क्षेत्राच्या उन्नतीसाठी वचनबद्ध आहे.
Movin Gudinho
Movin GudinhoDainik Gomantak
Published on
Updated on

फातोर्डा: सहकार क्षेत्र (Cooperative sector) हे देशाच्या प्रगतीसाठी महत्वपुर्ण असुन केंद्र व राज्य सरकार (State Government) या क्षेत्राच्या उन्नतीसाठी वचनबद्ध आहे. केंद्र सरकार (Central Government) तर देशाच्या सहकार क्षेत्राला अनन्यसाधारण महत्व देत आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने वेगळे सहकार मंत्रालयाची स्थापना केल्याचे गोव्याचे वाहतुक तथा पंचायत मंत्री मॉविन गुदिन्हो (Movin Gudinho) यानी सांगितले. मडगाव स्कुल कॉम्पलेक्स पतसंस्थे तर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या सोहळ्यास सन्माननिय अतिथी म्हणुन सर्व शिक्षा अभियानचे माजी चेअरमन तथा शिक्षणतज्ञ मिनानाथ उपाध्ये उपस्थित होते. खास पाहुणे म्हणुन पतसंस्थेचे माजी चेअरमन किसन फडते उपस्थित होते. व्यासपिठावर चेअरमन बाबाजी देसाई, सचिव संदीप रेडकर, उपाध्यक्ष पिटर गोम्स, खजिनदार लॉरेन्सिया वाझ उपस्थित होते. सहकार चळवळ चालवणे सोपी गोष्ट नाही, तरी या पतसंस्थेने जी प्रगती साधली आहे ती पाहता ही संस्था या क्षेत्रातील एक आदर्श संस्था असल्याचे मंत्री गुदिन्हो यानी सांगितले. सहकार क्षेत्रात व्यावसायिकता, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास हे क्षेत्र प्रगतीचे उच्च शिखर गाठू शकेल असेही मंत्री गुदिन्हो यानी सांगितले.

Movin Gudinho
माजी सभापतींचे बंधू प्रेमेंद्र शेट यांनी समर्थकांसह मगोत केला प्रवेेश!

सहकार क्षेत्रामुळे देशाच्या व राज्याच्या आर्थिक क्षेत्राचा विकास साध्य होत असल्याचे सन्माननिय अतिथी मिनानाथ उपाध्ये यानी सांगितले. शिक्षकांना सद्याच्या युगात मानाचे स्थान मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुद्धा एक चांगला शिक्षक होण्याचा प्रयत्न करावा असे आवाहनही त्यानी या प्रसंगी केले. या प्रसंगी माजी चेअरमन किसन फडते या प्रसंगी माजी चेअरमन किसन फडते याचे भाषण झाले. मडगाव स्कुल कॉम्पलेक्स पतसंस्थेच्या वेबसाईटचे उदघाटन प्रमुख पाहुण्या हस्ते करण्यात आले.

तसेच श्री दामोदर विज्ञान उच्चमाध्यमिक विद्यालयाचे प्रिंसिपल राजीव के देसाई तसेच विद्यार्थिनी प्रज्ञा रमेश तवडकर यांच्या खास सत्कार करण्यात आला. संस्थेचे चेअरमन बाबाजी सावंत यानी सर्वांचे स्वागत केले. पतसंस्थेच्या सभासदांची संख्या 36 वरुन जवळजवळ 2000 कडे पोहोचली आहे असे त्यांनी सांगितले. तसेच पतसंस्थेच्या विस्ताराची माहिती दिली. खजिनदार लॉरेन्सिया वाझ हिने पतसंस्थेच्या कामाचा अहवाल सादर केला. या प्रसंगी पतसंस्थेच्या सभासदांच्या 68 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यात 35 दहावी, 11 उच्च माध्यमिक, 13 पदवीधर, 1 डिप्लोमा, 1 पदव्युत्तर, क्रिडा क्षेत्रात व 4 इतर क्षेत्रामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com