Dabolim Airport : ‘दाबोळी’चा विस्तार होतोय; विमानतळ बंद पडणार नाही : माविन गुदिन्हो

Dabolim Airport : माझ्याकडून पराभूत झालेल्याचा पुन्हा पराभव निश्‍चित
Dabolim Airport
Dabolim Airport Dainik Gomantak

Dabolim Airport :

वास्को, दाबोळी विमानतळ कधीच बंद पडणार नाही. विमानतळाचा आणखी विस्तार होत असताना, विमानतळ बंद पडणार, असे बोलणे एकदम चुकीचे आहे.दोन विमाने येथून गेल्याने विमानतळ बंद पडू शकत नाही.

येणाऱ्या काळात दाबोळी विमानतळ दक्षिण गोव्याचा केंद्र बिंदू ठरणार असल्याचे पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले.गेल्या विधानसभा निवडणुकीत माझ्याकडून पराभूत झालेल्या उमेदवाराचा पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीत पराभव निश्चित असल्याचा दावा मंत्री गुदिन्हो यांनी केला.

दक्षिण गोवा भाजप लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार पल्लवी श्रीनिवास धेंपे यांनी गुरुवारी दाबोळी मतदारसंघाचा दौरा केला.याप्रसंगी दाबोळीचा राजा सेवा समितीच्या सभामंडपात आयोजित जाहीर सभेत दाबोळीचे आमदार तथा पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, चिखलीचे सरपंच कमला प्रसाद यादव,

उपसरपंच ऐश्वर्या कोरगावकर, पंच सुनिता यादव, पुनम च्यारी, दत्तप्रसाद बांदोडकर, दाबोळी भाजप गटाध्यक्ष संदीप सूद, युवा मोर्चा अध्यक्ष अमय सैल, दाबोळी भाजप प्रभारी जयंत जाधव, नगरसेवक दीपक नाईक, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षा सुवर्णा तेंडूलकर, जिल्हा पंचायत सदस्य अनिता थोरात, मुरगावचे नगरसेवक सुदेश भोसले, विनोद किनळेकर, अजय लांबा, दामू कोचरेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Dabolim Airport
Goa News : भाजपमुळे राज्याचे अस्तित्व धोक्यात : कॅ. विरियातो फर्नांडिस

पुढे बोलताना गुदिन्हो म्हणाले की, प्रत्येकवेळी दाबोळी विमानतळ बंद पडणार असे सांगून विरोधी पक्षनेते दक्षिण गोव्यातील जनतेची दिशाभूल करत आहेत.दाबोळी विमानतळ येणाऱ्या काळात आणखी भरारी घेईल.

दक्षिण गोवा भाजप उमेदवार पल्लवी धेंपे यांनी सांगितले की,भाजपने देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीपथावर जात आहे. गरीब योजना, किसान योजना, उज्ज्वला योजना बरोबर कौशल्य भारत योजना राबवून पंतप्रधान मोदी यांनी देशाबरोबर राज्याचा विकास साधला आहे.

सरपंच कमला प्रसाद यादव यांनी सांगितले की, धेंपे व तिंबलो कुटुंबाचा गोव्याच्या विकासात आर्थिक, उद्योग, सामाजिक व क्रीडा क्षेत्रात महत्वाचा वाटा आहे. सूत्रसंचालन पंच दत्तप्रसाद बांदोडकर यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com