Goa Traffic Police: गोवा वाहतूक पोलिस सेलने वाहतूक विभागाकडे वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 15000 लोकांचे वाहन चालविण्याचे परवाने रद्द करण्याची शिफारस केली आहे.
पोलीस अधीक्षक (वाहतूक) अक्षत कौशल यांच्या हवाल्याने स्थानिक इंग्रजी प्रसारमाध्यमांनी हे वृत्त दिले आहे.
कौशल यांनी म्हटले आहे की, “आम्ही वाहतूक विभागाला या वर्षी (जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत) विविध प्रकारच्या वाहतुकीचे उल्लंघन केल्याबद्दल 15000 व्यक्तींचे ड्रायव्हिंग परवाने रद्द करण्याची विनंती पाठवली आहे. त्यापैकी 1100 दारू पिऊन गाडी चालवण्याचे आहेत.
आम्ही मद्यपान करून वाहन चालवल्याबद्दल 1400 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऑगस्ट 2023 पर्यंत, वाहतूक पोलिसांच्या अभिप्रायावर कारवाई करत परिवहन विभागाने जवळपास 3000 परवाने निलंबित केले आहेत.
ओव्हरस्पीडिंग करणाऱ्या व्यक्तींचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्यासाठी तब्बल 8700 शिफारशी परिवहन विभागाकडे पाठवण्यात आल्या आहेत.
तर जे लोक वाहन चालवताना वारंवार मोबाईलवर बोलताना आढळले आहेत त्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्यासाठी 2500 शिफारशी करण्यात आल्या आहेत.
परिवहन विभाग आणि गोवा वाहतूक पोलिस समनव्याने काम करत आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे वाहतुकीचे उल्लंघन रोखण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरत आहेत.
दरम्यान, दोना पावला ते मिरामार आणि मिरामार ते दयानंद बांदोडकर रोड, पणजीपर्यंतच्या कॅप्टन ऑफ पोर्ट्सपर्यंतच्या रस्त्यावर कॅमेरे बसवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.