Goa Traffic Police: 'बेशिस्त' वाहनचालकांना वाहतूक पोलिसांचा दणका! वर्षभरात 94 लाखांहून अधिक दंड वसूल; 5,025 जणांवर कारवाई

Goa Traffic Police Action: दक्षिण गोव्यातील मडगाव, कोलवा आणि मायणा-कुडतरी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत २०२५ या वर्षात वाहतूक पोलिसांनी शिस्तभंगाच्या कारवाईचा बडगा उगारला आहे.
Goa Traffic Police
Goa Traffic PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Traffic Violations : दक्षिण गोव्यातील मडगाव, कोलवा आणि मायणा-कुडतरी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत २०२५ या वर्षात वाहतूक पोलिसांनी शिस्तभंगाच्या कारवाईचा बडगा उगारला आहे. वर्षभरात झालेल्या एकूण १८,३७२ वाहतूक नियमांच्या उल्लंघनांमधून प्रशासनाने तब्बल ९४ लाख ३१ हजार ५०४ रुपयांचा दंड वसूल केला आहे. रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठी आणि बेशिस्त वाहनचालकांना चाप लावण्यासाठी पोलिसांनी ही व्यापक मोहीम राबवली होती.

वाहतूक विभागाने प्रसिद्ध केलेल्या विभागवार आकडेवारीनुसार, 'डेंजरस पार्किंग' (धोकादायक ठिकाणी वाहन उभे करणे) हे सर्वात मोठे उल्लंघन ठरले आहे.

वर्षभरात अशा ५,०२५ प्रकरणांची नोंद झाली. त्यापाठोपाठ 'नो-एन्ट्री' नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४,२१९ गुन्हे नोंदवण्यात आले. तसेच 'नो-पार्किंग' क्षेत्रात वाहने उभी केल्यामुळे १,००५ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.

Goa Traffic Police
Goa politics: युती न केल्‍यानेच ‘आप’ला निवडणुकीत फटका! पालेकरांचा दावा; सांताक्रूजमधील मतदारांना विश्‍‍वासात घेऊन निवडणार पर्याय

हेल्मेट आणि वेग मर्यादेकडे दुर्लक्ष

दुचाकीस्वारांमध्ये हेल्मेट न वापरण्याचे प्रमाण अद्यापही चिंताजनक आहे. २०२५ मध्ये हेल्मेट नियमांचे पालन न केल्याबद्दल २,३९१ गुन्हे दाखल झाले, ज्यातून १५.७३ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

तसेच, अतिवेगाने वाहने चालवणाऱ्या १,९६७ जणांवर कारवाई करत पोलिसांनी १५.६७ लाख रुपयांचा दंड गोळा केला. सीट बेल्ट न लावणाऱ्या ४४६ चालकांवर आणि मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या ३४१ तळीरामांवरही पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे.

Goa Traffic Police
Goa Opinion: 'बर्च क्लब'प्रकरणी कठोर कारवाई व्हावी, अन्यथा गोव्यातील पर्यटन मान टाकेल आणि राज्य भयाण आर्थिक संकटात सापडेल..

इतर विविध गुन्ह्यांवरही पोलिसांची करडी नजर

केवळ पार्किंग किंवा हेल्मेटच नव्हे, तर लेन कटिंग, डोळ्यांना त्रास देणारे बल्ब, फॅन्सी किंवा सदोष नंबर प्लेट्स आणि कागदपत्रे नसलेल्या वाहनांवरही पोलिसांनी कारवाई केली आहे.

याशिवाय सायलेन्सरमधून निघणारा अतिधूर आणि सिग्नल तोडणाऱ्या वाहनचालकांकडूनही दंड वसूल करण्यात आला आहे. शहरातील रस्त्यांवरील सुरक्षा वाढवण्यासाठी आणि नियमांचे पालन व्हावे यासाठी ही मोहीम यापुढेही कडकपणे सुरूच राहील, असा इशारा वाहतूक विभागाने दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com