वापरलेल्या तेलाचा आरोग्‍याला फटका! राज्यातील गाडे, छोट्या हॉटेल्‍सना होतोय मोठ्या प्रमाणात पुरवठा; स्ट्रीट फूड लव्हर्ससाठी धोक्याची घंटा

used cooking oil scam goa: अनेक हॉटेल्‍स आणि रेस्‍टॉरन्‍ट वापरलेले आणि २५ टीपीसीपेक्षा (टोटल पोलर कॉम्‍पोऊन्‍ड) अधिक मात्र असलेले खाद्यतेल चढ्या दराने गाडे आणि छोट्या हॉटेल्‍सना विकतात.
used cooking oil scam goa
used cooking oil scamDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: अनेक हॉटेल्‍स आणि रेस्‍टॉरन्‍ट वापरलेले आणि २५ टीपीसीपेक्षा (टोटल पोलर कॉम्‍पोऊन्‍ड) अधिक मात्र असलेले खाद्यतेल चढ्या दराने गाडे आणि छोट्या हॉटेल्‍सना विकतात. त्‍याचा वापर पुन्‍हा होत असल्‍याने त्‍याचा फटका स्‍थानिक जनतेच्‍या आरोग्‍याला बसत आहे. त्‍यामुळे अशा खाद्यतेलाचे दर नियंत्रणात ठेवण्‍यासाठी राज्‍य प्रदूषण नियंत्रण मंडळाने (पीसीबी) प्रयत्‍न सुरू केले आहेत, अशी माहिती मंडळाच्‍या वरिष्‍ठ अधिकाऱ्याने मंगळवारी ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली.

मोठमोठी हॉटेल्‍स तसेच रेस्‍टॉरन्‍ट्‍स एकाचवेळी टाकलेल्‍या तेलात अनेक पदार्थ तळतात. काही हॉटेल्‍स आणि रेस्‍टॉरन्‍ट्‍स असे तेल ९० रुपये लीटरप्रमाणे एजन्‍सींना पुरवतात. या एजन्‍सी हेच तेल १५० ते १६० रुपये दराने ऑस्‍ट्रिीयात बायो डिझेलसाठी पाठवतात.

used cooking oil scam goa
Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

दुसरीकडे, अनेक हॉटेल्‍स (Hotel) आणि रेस्‍टॉरन्‍ट्‍स अशा तेलाचा पुरवठा गाडे आणि छोट्या हॉटेल्‍सना १२० रुपये दरानुसार करतात. खुल्‍या बाजारात खाद्यतेलाची किंमत सरासरी १६० रुपये असल्‍यामुळे गाडे आणि छोट्या हॉटेल्‍सचे मालक कमी दरात त्‍यांच्‍याकडून अशा तेलाची खरेदी करतात आणि त्‍यात पदार्थ तळून ग्राहकांना देतात. अशा पदार्थांचे सेवन केल्‍यामुळे नागरिकांना आरोग्‍याच्‍या विविध समस्‍या निर्माण होत आहेत, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

used cooking oil scam goa
Goa Crime: प्रेमासाठी बिहारहून थेट गोव्यात! प्रेयसीला पटवण्यात अपयश, संतापातून दाम्पत्यावर जीवघेणा चाकूहल्ला; आरोपी वेर्णा पोलिसांच्या जाळ्यात

दरावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू

२५ टीपीसीपेक्षा अधिक मात्रा असलेल्‍या खाद्यतेलाच्‍या दरावर नियंत्रण आणण्‍यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रयत्‍न सुरू केले आहेत. हे दर ४० ते ४५ रुपये या दरम्‍यान राहिल्‍यास त्‍याचा भारतातच बायो डिझेलसाठी वापर होऊ शकतो, असेही त्‍यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com