..तर पर्यटक पुन्हा गोव्यात येणार नाहीत! टॅक्सीभाडयावरील प्रश्नावरून मंत्री गुदिन्हो यांचा इशारा; ओला-उबेरला थारा देणार नसल्याची स्पष्टोक्ती

Goa tourist taxi issue: गोव्यात येणाऱ्या पर्यटकांशी भाडेदरांबाबत हुज्जत घालून गोव्याची बदनामी करणाऱ्या टॅक्सीचालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिला.
Mauvin Godinho
Mauvin GodinhoDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: गोव्यात येणाऱ्या पर्यटकांशी भाडेदरांबाबत हुज्जत घालून गोव्याची बदनामी करणाऱ्या टॅक्सीचालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिला. तसेच ‘ओला’ आणि ‘उबेर’सारख्या अ‍ॅपआधारित अ‍ॅग्रीगेटर्सचे गोव्यात स्वागत केले जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘मुख्यमंत्री गोंयचो टॅक्सी पात्रांव’ योजनेच्या पाचव्या टप्प्यातील लाभार्थ्यांना ५० नवीन सीएनजी-चलित टॅक्सी सुपूर्द करण्याचा कार्यक्रम वेर्णा येथील ह्युंदाई शोरूममध्ये आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात मंत्री गुदिन्हो बोलत होते. ते म्‍हणाले, ओला व उबेरच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करताना अनेक गोष्टी उघडकीस आल्या आहेत. त्या दोन्ही कंपन्या काही गंभीर समस्यांना तोंड देत आहेत. त्यांचे मॉडेल गोव्यात चालू शकत नाही.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सुरू केलेली ही योजना आज देशातील एक आदर्श ठरली आहे. गोवा माईल्सनेही या योजनेच्या यशात मोठा वाटा उचलला आहे. गोवा माईल्सकडे आता पाच हजार टॅक्सी आहेत आणि त्यांनी तब्बल एक कोटी प्रवासी हाताळले आहेत, अशी माहिती मंत्री गुदिन्हो यांनी दिली.

Mauvin Godinho
Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार वॉटर मेट्रो टॅक्‍सी! प्रवाशांना मिळणार नवा पर्याय, नदीपरिवहन मंत्री सुभाष फळदेसाईंची माहिती

या योजनेअंतर्गत असलेले ३०० लाभार्थी दरमहा अंदाजे एक लाख रुपये कमवतात. ही बाब देशभरात अनुकरणीय ठरेल याबद्दल त्यांनी विश्वास व्यक्त केला. दरम्‍यान, तत्‍पूर्वी आपण ‘ओला’ व ‘उबेर’संबंधी इतर राज्यांतील टॅक्सीचालकांशीही संवाद साधल्याची माहिती गुदिन्‍हो यांनी दिली.

Mauvin Godinho
Goa Taxi: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर जबरदस्तीने लादणार नाही'! गुदिन्‍होंची हमी; सरकारकडे सुमारे 3500 सूचना, हरकती

काही स्थानिक टॅक्सीचालक गोवा माईल्सच्या टॅक्सी अडवतात. त्यामुळे पर्यटक आणि प्रवाशांना अनावश्यक त्रास सहन करावा लागतो. हे प्रकार सुरू राहिले तर पर्यटक पुन्हा गोव्यात येणार नाहीत. अशा टॅक्‍सीचालकांवर कठोर कारवाई करण्‍यात येईल.

- माविन गुदिन्‍हो, वाहतूकमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com