
domestic tourists for the New Year celebrations in Goa
पणजी: गोव्यात येणाऱ्या प्रवाशांच्या आकड्यांमध्ये वाढ झाली आहे. वर्ष २०२४ मध्ये ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक प्रवासी गोव्यात आल्याची माहिती पर्यटन विभागाने जाहीर केली आहे. गोव्यातील दाबोळी विमानतळाबद्दल सांगायचं झाल्यास पर्यटन विभागाच्या माहितीनुसार २० ते ३१ डिसेंबर या कालावधीत १.२ लाख देशी तर ४,७०० आंतराष्ट्रीय प्रवासी उतरल्याचे नोंद झालीये. हा आकडा पहिला तर वर्ष २०२३ च्या तुलनेत गोव्यात येणाऱ्या देशी प्रवाशांचा आकड्यात २७ टाक्यांची वाढ झाली असल्याचं पर्यटन विभागाने नमूद केलं आहे.
हे आकडे मांडताना पर्यटन विभागाने गोव्याच्या दृष्टीने ही बाजू जमेची असल्याचं म्हटलंय. आजही पर्यटकांसाठी गोवा हे आवडीचं पर्यटनस्थळ आहे आणि गोव्याने डिसेंबर महिन्यात लक्षणीय महसुलात वाढ नोंदवली असून मागील वर्षाच्या तुलनेत महसुलात ७५.५ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
गेल्या बऱ्याच काळापासून गोव्यात यंदाच्यावर्षी पर्यटनमध्ये घट झाली असल्याच्या बातम्या फिरतायत. गोव्यातील समुद्र किनारे ओसाड पडले असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे, मात्र पर्यटन खात्याच्या माहितीनुसार ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या कालावधीत प्रवाशांच्या आकड्यात लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे.
वर्ष २०२४ मध्ये एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत गोव्याचा एकूण महसूल ४,६१४.८ कोटी रुपयांवर जाऊन पोहोचला आहे, जो २०२३ मधील याच कालावधीतील महसुलाच्या तुलनेत ३६५.४ कोटी रुपयांनी अधिक आहे. गोव्याच्या महसुलात पर्यटनाचा मोठा वाटा आहे. पर्यटनमंत्री रोहन खंवटे अजूनही गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या सकारात्मक असल्याच्या माहितीलाच दुजोरा देत आहेत. पर्यटन हा गोव्याचा एक प्रमुख व्यवसायअसून इथे अनेक स्थानिक पर्यटनामधून येणाऱ्या महसूलावरच जीवन व्यतीत करतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.