
CM Dr. Pramod Sawant on Goa Tourism
पणजी: खरंतर नवीन वर्षाच्या सुरुवातीला गोव्यात पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. ख्रिसमस, ३१ डिसेंबर आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने देशी-विदेशी पर्यटक गोव्याकडे वळतात, मात्र यंदाच्या वर्षी चित्र बदलल्याच्या बातम्या समोर येत आहेत. काहींच्या मते हॉटेल्सच्या वाढत्या किमतींमुळे गोव्यातील पर्यटनाचा खर्च वाढला असल्याने पर्यटक खिशाला परवडणारी पर्यायी ठिकाणं निवडतात, मात्र मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अशा बातम्यांना खोडून काढले.
मुख्यमंत्र्यांच्या मते सोशल मीडियावर काही लोकं विनाकारण खोट्या बातम्या पसरवत आहेत. पर्यटकांना गोव्याबद्दल असलेलं आकर्षण कमी झालंय आणि ते इतर पर्याय शोधतायत असं सांगितलं जातंय जे की सपशेल चुकीचं आहे.
सोशल मीडियावर अशा अफवा पसरावणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी स्वतः किनाऱ्यांना भेट देत माहिती तपासून घ्यायचा सल्ला दिला आहे आणि विनाकारण चुकीच्या बातम्या फिरवून गोव्याच्या लोकांना भरकटवू नये असे सांगितले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदा देखील डिसेंबर, जानेवारी असे महिने गोव्यासाठी उत्तम असणार आहेत. देश-विदेशातून पर्यटक गोव्याला भेट देत आलेत आणि तेच यंदा देखील होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या गोव्यातील हॉटेल्स भरलेत, समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी आहे तसेच रस्त्यांवर सुद्धा अनेक पर्यटकांच्या रांगा दिसतायत आणि गोवा त्यांचे दरवर्षीप्रमाणे मनापासून स्वागत करतोय असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.