Goa Tourism: 2024 मध्ये गोव्याला फटका, 25 टक्के पर्यटन घटल्याचा व्यावसायिकांचा दावा

Goa Tourism Decline: गोवा राज्य हे देशातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात देश-विदेशातील पर्यटक येतात.
Goa Beach
Goa Tourism DeclineDainik Gomantak
Published on
Updated on

Tourist Decline In Goa

पणजी: गोवा राज्य हे देशातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात देश-विदेशातील पर्यटक येतात. मात्र, यंदा पर्यटन व्यवसायात २० ते २५ टक्क्यांनी घट झाल्याचा दावा करण्‍यात आला आहे. दरवर्षी गोव्यात पर्यटन व्यवसाय उत्तम होतो. मात्र, यंदा हा व्यवसाय समाधानकारक राहिला, असे ‘ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवा’चे (टीटीएजी) अध्यक्ष जॅक सुखिजा यांनी सांगितले.

यंदा दक्षिण गोव्यात पर्यटनासाठी कुटुंबे मोठ्या प्रमाणात येताना दिसली, तर उत्तर गोव्यात नेहमीप्रमाणे पर्यटकांची गर्दी होती. दक्षिण गोव्यात शांत वातावरण असल्याने अनेकांनी नवीन वर्ष साजरे करण्यासाठी हा पर्याय निवडला. ज्यांना मनोरंजन हवे होते, त्यांनी उत्तर गोव्यात नवीन वर्ष साजरे केले, असे सुखिजा म्हणाले.

Goa Beach
IRCTC Goa Tour Package: आयआरसीटीसीचं ‘गोवा टूर पॅकेज’! मिळेल सर्व काही बजेटमध्ये; जाणून घ्या डिटेल्स

२० डिसेंबरनंतर मोठा फटका

जॅक सुखिजा म्हणाले की, २० डिसेंबरनंतर हॉटेल बुकिंगमध्ये मोठी घट झाली. हिवाळी हंगामात पर्यटकांची संख्या अधिक असते; पण यंदा दर वाढल्याने बुकिंग कमी झाले. आधी हॉटेल बुकिंग केले होते, ते वगळता नवीन बुकिंग झालेच नाही. याचा मोठा फटका व्यावसायिकांना बसला. गोव्याच्या पर्यटन व्यवसायात झालेली ही घट चिंताजनक असून अर्थव्यवस्थेवरही याचा परिणाम झाला आहे. वाढलेले दर, पर्यटकांना आकर्षित करण्यातील अपयश तसेच वाढती स्पर्धा यांवर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत सुखिजा यांनी व्यक्त केले.

Goa Beach
Goa Tourism: "गोव्यातली हॉटेल्स यंदाही फुल्ल!! सोशल मीडियावर अफवा पसरवू नका" मुख्यमंत्र्यांनी नेटकऱ्यांना खडसावले

काही भागांत अपेक्षेनुसार व्‍यवसाय : कार्दोज

शॅकमालक संघटनेचे अध्यक्ष क्रुझ कार्दोज म्हणाले की, यंदा व्यवसाय चांगला झाला, पर्यटकांची संख्याही समाधानकारक होती. विशेषतः नाताळनंतर पर्यटकांमध्ये वाढ झाली. मात्र, सर्वच ठिकाणी व्यवसाय चांगला झाला, असे म्हणता येणार नाही. काही विशिष्ट भागांमध्ये पर्यटन व्यवसाय व्यवस्थित झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com