वास्को: Goa Tourism: यंदाचा समुद्र पर्यटन हंगामाला 30 सप्टेंबर पासून 'कार्डेलिया एम्प्रेस' या जहाजाने सुरुवात होणार असून, या समुद्र पर्यटन मोसमात एकूण 51 देशी विदेशी पर्यटक जहाजे गोव्यात मुरगाव बंदरात दाखल होणार आहेत.
यात 35 फेऱ्या कार्डेलिया या देशांतर्गत पर्यटक जहाजाच्या तर 16 फेऱ्या विदेशी जहाजांच्या असणार आहेत. यामध्ये एकूण 7 लाख 45 हजार देशी विदेशी पर्यटक समुद्र मार्गे गोव्यात दाखल होणार असल्याने पर्यटन व्यवसायाला तेजी येण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे. (Goa tourism season to begin on September 30 2022, 51 ships to enter)
कोरोना महामारीमुळे 2020 पासून समुद्र पर्यटन बंद झाल्याने टॅक्सी, बस रेस्टॉरंट व इतर संबंधित व्यवसायावर परिणाम झाला होता. त्यामुळे देशी जहाजाबरोबर विदेशी जहाजांची रेल चेल पूर्णपणे बंद झाली होती. त्यानंतर वर्ष 2021 पासून समुद्र पर्यटन हंगाम सुरू झाल्याने, पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याने, देशांतर्गत समुद्र पर्यटन सुरू करून केंद्र सरकारने एका प्रकारे पर्यटन हंगामाला चालना दिली आहे.
2021 साली 27 सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत कार्डेलिया या देशांतर्गत पर्यटक जहाजाच्या एकूण 20 फेऱ्या झाल्या. नंतर 2022 साली जानेवारी ते मे पर्यंत 22 फेऱ्या झाल्या आहेत. यात 42 फेऱ्या सुमारे 84 हजार पर्यटक गोव्यात दाखल झाले होते.
दरम्यान सध्या विदेशी जहाजांची कॅरेबियन देशात वर्दळ सुरू आहे. त्या ठिकाणी कोरोनाचा फैलाव नसल्याने सागरी पर्यटन हंगामाला जोमाने सुरू आहे. दरम्यान गोव्याच्या सागरी पर्यटन हंगाम यंदाचा 30 सप्टेंबर पासून सुरू होत आहे. मुरगाव बंदरात पर्यटक जहाज दाखल होणार असल्याने व्यावसायिक सुखावले आहे. गोव्यात दाखल होणाऱ्या पर्यटकांच्या बाबतीत कोविड संबंधीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात येणार यात शंकाच नाही.
मागील वर्षी कोरोनामुळे पर्यटनाला फटका बसला. 2019 साली देशी विदेशी मिळून 80 लाख 24 हजार 64 हजार 400 पर्यटकांनी राज्याला भेट दिली होती. त्या तुलनेत 2020 साली नोव्हेंबर पर्यंत केवळ 25 लाख 82 हजार 52 पर्यटक राज्यात येऊ शकले. नंतर 2021-22 साली 42 देशांतर्गत जहाजाच्या फेऱ्या 84 हजार पर्यटक राज्यात दाखल झाले.
दरम्यान यंदाच्या 2022-23 समुद्र पर्यटन हंगाम 30 सप्टेंबर पासून 'कार्डेलिया एक्सप्रेस' या जहाजाने सुरुवात होणार असून यातून 2 हजार प्रवासी व 650 कर्मचारी वर्ग मिळवून 2 हजार 650 पर्यटक गोव्यात मुरगाव बंदरात दाखल होणार आहे. कार्डेलिया एक्सप्रेस या देशांतर्गत जहाजाच्या गोव्यात मुरगाव बंदरात एकूण 35 फेऱ्या होणार असून यात 7 लाख 21 हजार पर्यटक गोव्यात दाखल होणार आहेत.
सप्टेंबर 2022 पाच फेऱ्या, नोव्हेंबर महिन्यात पाच फेऱ्या, डिसेंबर महिन्यामध्ये पाच फेऱ्या, मिळून 2022 मध्ये 15 फेऱ्या होणार आहेत. नंतर 2023 मध्ये जानेवारीत चार फेऱ्या, फेब्रुवारी महिन्यात चार फेऱ्या, मार्च महिन्यात चार फेऱ्या, एप्रिल महिन्यात पाच फेऱ्या तर मे महिन्यात दोन फेऱ्या अशा मिळून एकूण जहाजाच्या 35 फेऱ्या गोव्यात मुरगांव बंदरात होणार आहे.
यंदाच्या सागरी पर्यटन हंगामात भारतात तसेच गोव्यात मुरगाव बंदरात 15 विदेशी पर्यटक जहाजे दाखल होणार आहेत. यात 16 नोव्हेंबर 2022 रोजी मुरगाव बंदरात सकाळी 9 वाजता हे विदेशी पर्यटक जहाज जवळजवळ 1000 प्रवासी व 600 कर्मचारी वर्ग मिळून 2600 पर्यटकांना घेऊन दाखल होणार आहे. नंतर संध्याकाळी सदर जहाज या पर्यटकांना घेऊन रवाना होणार आहे.
27 नोव्हेंबर रोजी युरोप हे विदेशी जहाज सकाळी 7 वाजता मुरगांव बंदरात 1500 पर्यटकांना घेऊन दाखल होणार आहे. 1 डिसेंबर रोजी सेवन सिज हे विदेशी जहाज सुमारे 1500 देशी-विदेशी पर्यटकांना घेऊन दाखल होणार आहे.
14 डिसेंबर 2022 रोजी नौटीका हे विदेशी पर्यटक जहाज सकाळी 9 वाजता 1 हजार 500 देशी विदेशी पर्यटकांना घेऊन मुरगाव बंदरात दाखल होणार आहे. तसेच याच दिवशी ओशियन ओडिसी हे विदेशी पर्यटक जहाज 1600 देशी विदेशी पर्यटकांना घेऊन मुरगाव बंदरात दाखल होणार आहे.
दरम्यान 10 जानेवारी 2023 रोजी मुरगाव बंदरात सकाळी 9 वाजता 'द वर्ल्ड' हे विदेशी पर्यटक जहाज 1 हजार 500 देशी विदेशी पर्यटकांना घेऊन दाखल होणार आहे. 6 फेब्रुवारी 2023 रोजी नौटिका हे विदेशी पर्यटक जहाज 1500 देशी विदेशी पर्यटक जहाज पुन्हा गोव्यात मुरगांव बंदरात दाखल होणार आहे.
15 मार्च 2023 रोजी बोरियलीस हे विदेशी जहाज सकाळी 8 वाजता मुरगाव बंदरात 1450 देशी विदेशी पर्यटकांना घेऊन दाखल होणार आहे. नंतर संध्याकाळी 4 वाजता सदर जहाज रवाना होणार आहे. 22 मार्च 2023 रोजी सकाळी 8 वाजता सिल्वर स्पिरिट हे विदेशी पर्यटक जहाज सुमारे 1400 देशी विदेशी पर्यटकांना घेऊन मुरगाव बंदरात दाखल होणार आहे.
23 मार्च 2023 रोजी ओसियन ओडिस्सी हे विदेशी पर्यटक जहाज पुन्हा गोव्यात दाखल होणार आहे. 1600 देशी विदेशी पर्यटकांना घेऊन मुरगाव दाखल झाल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता जहाज रवाना होणार आहे.
31 मार्च 2023 रोजी व्हीकींग नेपच्यून हे विदेशी पर्यटक जहाज 1500 पर्यटकांना घेऊन सकाळी 7 वाजता मुरगाव बंदरात दाखल होणार आहे. 10 एप्रिल रोजी सेव्हन सीज मरीनर हे विदेशी पर्यटक जहाज देशी विदेशी पर्यटकांना घेऊन सकाळी 8 वाजता मुरगाव बंदरात दाखल होणार आहे.
1 मे 2023 रोजी विदेशी पर्यटक जहाज मुरगांव बंदरात 1500 देशी विदेशी पर्यटकांना घेऊन दाखल होणार आहे. 2 मे रोजी इनसिंग्नीया हे विदेशी पर्यटक जहाज सकाळी 9 वाजता मुरगांव बंदरात देशी विदेशी पर्यटकांना घेऊन दाखल होणार आहे. तर 23 मे रोजी 2022-23 या सागरी पर्यटन हंगामातील शेवटचे विदेशी पर्यटक जहाज नौटिका मुरगांव बंदरात 1500 पर्यटकांना घेऊन दाखल होणार आहे.
सर्व विदेशी पर्यटक जहाजे युरोप कंट्री मधून दुबई, मस्कत, श्रीलंका असा प्रवास करत भारतात मुंबई, न्यू मंगलोर, कोचिंग असा प्रवास करून गोव्यात मुरगांव बंदरात दाखल होणार आहे. एकूण 16 फेऱ्या या विदेशी जहाजांच्या मुरगाव बंदरात होणार असून यात सुमारे 24 हजार देशी-विदेशी पर्यटक गोव्यात दाखल होणार आहेत.
सदर सर्व जहाजे जे एम बक्सी यांच्या प्रायोजनाखाली दाखल होणार असून या जहाजांच्या आगमनाची तसेच स्वागतासाठी सर्व तयारी पूर्ण केली असल्याचे जे एम बक्सीचे सर्व व्यवस्थापक गोविंद पेनुर्लकर यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.