Michael Douglas: गोव्यानंतर हॉलीवूडचे स्टार कपल मायकल डग्लस, कॅथरीन झेटा-जोन्स हिंदू मंदिरांच्या प्रेमात...

कर्नाटकातील काबिनी, तामिळनाडूतील तंजावूर येथे विविध ठिकाणे, मंदिरांना दिली भेट
Michael Douglas-Catherine Zeta-Jones:
Michael Douglas-Catherine Zeta-Jones:Dainik Gomantak

Michael Douglas-Catherine Zeta-Jones: हॉलीवूड स्टार मायकल डग्लस आणि त्यांची पत्नी अभिनेत्री कॅथरीन झेटा-जोन्स हे कपल गेल्या महिन्याच्या अखेरीस गोव्यातील 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी झाले होते. या महोत्सवात मायकल यांना सत्यजीत रे जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

दरम्यान, गोव्यानंतर हे स्टार कपल भारतातील विविध स्थळांना भेटी देत आहे. मायकल, कॅथरीन आणि त्यांचा मुलगा डिलन यांनी नुकतेच कर्नाटकातील काबिनी येथील लक्झरी रिसॉर्टमध्ये वास्तव्य केल्याचे समोर आले आहे. तिथून ते कोडागू येथे गेले.

याशिवाय तामिळनाडूतील तंजावूर येथील प्राचीन बृहदिस्वरा मंदिरालाही या तिघांनी भेट दिली.

Michael Douglas-Catherine Zeta-Jones:
Goa Government Hotels: स्वस्तात गोवा ट्रिप करायचीय? मग 'या' सरकारी हॉटेल्समध्ये करा बुकिंग

मायकल यांनी सोशल मीडियात याबाबत माहिती दिली आहे, त्यांनी ही इन्स्टा पोस्ट पत्नी कॅथरीन झेटा जोन्स यांनाही टॅग केली आहे.

मायकल यांनी साईटसीईंग विथ द बेस्ट अशी कॅप्शन दिली आहे. तसेच मंदिरात प्रार्थना केल्यानंतर त्यांनी मंदिरातील फोटोदेखील शेअर केले आहेत.

मुर्तीसमोर गळ्यात फुलांच्या माळा घालून या तिघांनीही फोटोज काढले आहेत.

हे शिवमंदिर भारतातील मोठ्या मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरात सुंदर द्रविडियन शिल्पकला पाहायला मिळते. चोल काळात हे मंदिर उभारले गेल्याचे सांगितले जाते.

Michael Douglas-Catherine Zeta-Jones:
आता समुद्रातील तरंगत्या ऑफिसमधून करा 'वर्क फ्रॉम गोवा'; 5G नेटवर्कसह विविध सुविधा पुरवणार

मायकल आणि कॅथरीन यांनी सन 2000 मध्ये लग्न केले होते. त्यांना मुलगा डिलन मायकल आणि मुलगी कॅरीज झेटा अशी दोन अपत्ये आहेत.

दरम्यान, नुकतेच या स्टार कपलच्या गोवा दौऱ्यात अभिनेत्री समिरा रेड्डी हीने कॅथरीन झेटा जोन्सची भेट घेतल्याचे फोटोज काही दिवसांपुर्वी व्हायरल झाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com