Morjim Encroachment: पर्यटन विभागाचा मोरजी किनाऱ्यावरील अतिक्रमणावर हातोडा; अनेकांचे धाबे दणाणले

पोलिस कर्मचार्‍यांच्या मदतीने केली कारवाई
Morjim Beach
Morjim BeachDainik Gomantak
Published on
Updated on

राज्यात पर्यटनाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरु केले आहेत. याचाच भाग म्हणून निमबाह्य कृत्यांवर पर्यटन विभागाने कारवाई सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर आज पर्यटन विभागाच्या पथकाने विठ्ठलदासवाडा, मोरजी समुद्र किनाऱ्यावर कारवाई करत अतिक्रमण केलेल्या हॉटेलचे साहित्य जप्त केले आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

(Goa Tourism Department seized illegally placed deck beds tents and other items at Morjim Beach )

मिळालेल्या माहितीनुसार विठ्ठलदासवाडा, मोरजी किनाऱ्यावर स्थानिक हॉटेल मालकांनी अवैधरित्या अतिक्रमण केले असल्याची तक्रार पर्यटन विभागाकडे आली होती. यावरुन पर्यटन विभागाने कारवाई केली आहे. या कारवाईवेळी पर्यटन विभागाने पोलिस कर्मचार्‍यांना देखील तैनात केले होते.

Morjim Beach
Mopa Airport: कधी होणार 'मोपा'वरुन विमान उड्डाण? नवी अपडेट आली समोर

या कारवाईत पर्यटन विभागाच्या पथकाने बेकायदेशीरपणे ठेवलेले बेड, तंबू, खुर्च्या, लाकडी टेबल, लोखंडी पोल, तसेच किनाऱ्यावर थाटलेले इतर साहित्य जप्त केले आहे. या कारवाईबाबतीत संबंधित हॉटेल मालकांना नोटीस बजावण्यात येणार आहे. तसेच नियम उल्लंघनावरुन स्पष्टीकरण मागवले जाणार असल्याची माहिती कारवाईत सहभागी एका कर्मचाऱ्याने दिली आहे.

Morjim Beach
Climate Change: वातावरण बदलामुळे गोवेकर हैराण, 'असे' आहे गोव्याचे हवामान

अशा प्रकारे अतिक्रमण करत बेकायदा साहित्य थाटणाऱ्यांवर यापुढे कारवाई सुरुच राहणार आहे. त्यामुळे अशा कृत्यांकडे वळताना हॉटेल मालकांनी विचार करावा असे या कारवाईबाबत माहिती देताना एका अधिकाऱ्यांने म्हटले आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com