
Rohan Khaunte viral video Goa Taxi: एखाद्या देशात आणि राज्यात तुलना केली जाऊ शकत नाही, त्यामुळे 'व्हिएतनाम की गोवा?' हा प्रश्नच चुकीचा आहे असे राज्याचे पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांनी एका हिंदी वाहिनीशी बोलताना सांगितले. देशविदेशात पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात सध्या पर्यटनाला अनुसरून अनेक गोंधळ आणि प्रश्न उपस्थित होतायत. मंत्री रोहन खवंटे यांनी याच प्रश्नांची उत्तरं सदर मुलाखतीतून दिली.
मंत्री खवंटे यांनी गोव्याच्या पर्यटन धोरणाबद्दल स्पष्टीकरण देताना म्हटले की, 'गोवा हे इतर ठिकाणांपेक्षा वेगळे आहे. आम्ही कोणालाही गोव्याला या असे म्हणून जबरदस्ती करत नाही, तर इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाचा 'अतिथी देवो भव' या विचाराने आदर करतो. त्यामुळेच, पर्यटक आपोआप गोव्याकडे आकर्षित होतात.' एका देशासोबत गोव्याची तुलना होत असेल, तर यातूनच राज्याची समृद्धी दिसून येते, असेही त्यांनी सांगितले.
देशभर गाजलेल्या गोव्यातील टॅक्सी वादावरही पर्यटनमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 'गोव्यातील टॅक्सी व्यवसाय अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि याच व्यवसायावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो,' असे ते म्हणाले.
'परदेशी पर्यटकांना १५ दिवसांच्या वास्तव्यात टॅक्सी चालक फक्त फिरवण्याचेच नाही, तर स्थानिक गाईड म्हणूनही मदत करतात आणि राज्याची माहिती देतात. त्यामुळे काही लोक चुकीचे वागत असले, तरी सगळ्यांना 'माफिया' म्हणणे योग्य नाही,' असे खवंटे यांनी ठामपणे सांगितले. येत्या काळात हा प्रश्न नक्कीच मार्गी लागेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.