72 तासांत समस्येवर निघणार तोडगा, गोव्यात CM Helpline सुरु; स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष आणि महत्वाच्या बातम्या

Goa Breaking News: गोव्यात दिवसभर घडणाऱ्या विविध क्षेत्रातील ठळक घडामोडींचा आढावा.
72 तासांत समस्येवर निघणार तोडगा, गोव्यात CM Helpline सुरु; स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष आणि महत्वाच्या बातम्या
Goa CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

72 तासांत समस्येवर निघणार तोडगा, गोव्यात CM Helpline सुरु

सार्वजनिक तक्रार संचालयनालयाकडून सीएम हेल्पलाईन 9319828581 क्रमांक सुरु. यात सात खात्याचा समावेश करण्यात आला आहे. नागरिक यावर संपर्क साधून त्यांच्या समस्या व तक्रारी मांडू शकतात. ७२ तासांत तक्रारीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार, मुख्यमंत्री सावंत यांची माहिती.

ड्रग्जबाबत वक्तव्य जीभ घसरल्यामुळे, मुख्यमंत्र्यांकडून सारवासारव

जीभ घसरल्यामुळे (Slip of the Tongue) ड्रग्स सर्वत्र उपलब्ध आहेत, असे मंत्री आलेक्स सिक्वेरांचे विधान. त्यांना ड्रग्सची समस्या (Problem) ही जगभर आहे असं म्हणायच होतं. समस्येऐवजी त्यांनी उपलब्ध (Available) आहे असं म्हटलं. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांकडून सिक्वेरांच्या वक्तव्यारुन सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

Goa Weather Update: गोव्यात पुन्हा रिमझिम पाऊस, विकेंडला यलो अलर्ट

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर गोव्यात पुन्हा रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने आज व येत्या रविवार आणि सोमवारी यलो अलर्ट जारी केला आहे.

72 तासांत समस्येवर निघणार तोडगा, गोव्यात CM Helpline सुरु; स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष आणि महत्वाच्या बातम्या
अमली पदार्थ सर्वत्र! गोवा सरकारच्या पर्यावरण मंत्र्याचे वादग्रस्त विधान, आपच्या आमदाराने घेतली शाळा

ड्रग्ज प्रकरणी सिक्वेरांच्या विधानावर व्हेन्झी व्हिएगस यांच्याकडून समाचार

जर ड्रग्स सगळीकडे आहे तर त्यावर नियंत्रण ठेवण्याचे ज्यांचे काम आहे त्यांना बदलण्याची गरज. सुरुवात तुमच्यापासून केली पाहिजे. ड्रग्स सर्वत्र उपलब्ध आहे या मंत्री आलेक्स सिक्वेरांच्या विधानावर आपच्या व्हेन्झी व्हिएगस यांच्याकडून समाचार.

Sunburn: ड्रग्स सर्वत्र उपलब्ध, फक्त सनबर्न कारण ठरु शकत नाही!

ड्रग्स सर्वत्र उपलब्ध. फक्त सनबर्नमध्ये ड्रग्स असतात असे अजिबात नाही. ड्रग्स पकडून देण्यासाठी पोलिसांना मदत करुया. पोलिसांनी PRO ACTIVE होण्याची गरज. माझ्या माहितीप्रमाणे हायकोर्टाच्या आदेशानंतर सनबर्न आयोजकानी थकीत पैसे दिले आहेत.

आयोजन झाल्यानंतर आमदारच पास मिळविण्यासाठी मागे लागतात. पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरांचे वक्तव्य.

Ravi Naik: बांगलादेशी हिंदूचे संरक्षण करण्याची गरज! माजी मुख्यमंत्री

आम्ही सर्व हेवेदावे विसरुन एकत्र येण्याची गरज. आज बांगलादेशातील हिंदूना हाकलवण्यात येत आहे. आम्ही यावर विचार करायला हवा. जे आमचे लोक आहेत त्यांचे संरक्षण आम्हीच केले पाहिजे. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान मंत्री रवी नाईकांचे प्रतिपादन.

Goa Politics: तानावडेंचे आधी शेर्माव नंतर पलटी!

मायकल लोबोंना भाजप ही धर्मशाळा नव्हे असे शेर्माव देणाऱ्या सदानंद शेट तानावडेंची मायकलना त्यांच्या घरी भेटल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पलटी. मायकलचे विधान म्हणे Misquote करण्यात आले.

सर्व तालुक्यातील प्रशासकीय इमारती सुसज्ज करणार

राज्यातील सर्व 12 तालुक्यातील प्रशासकीय इमारती सुसज्ज करणार. जिथे गरज आहे तिथे नव्या इमारतींची पायाभरणी. मुख्यमंत्र्यांची माहिती.

गोवा खाजन शेती बोर्डाची होणार स्थापना

राज्यातील खाजन शेतीच्या रक्षणासाठी राज्य सरकार गोवा खाजन शेती बोर्डाची स्थापना करणार. मुख्यमंत्र्यांची घोषणा.

Goa Independence Day: मुख्यमंत्र्यांकडून CM HELPLINE ची घोषणा!

लोकांना त्यांच्या समस्या आणि तक्रारींची थेट माहिती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून CM HELPLINE ची घोषणा. स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात केली घोषणा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com