अमली पदार्थ सर्वत्र! गोवा सरकारच्या पर्यावरण मंत्र्याचे वादग्रस्त विधान, आपच्या आमदाराने घेतली शाळा

Goa Sunburn: मंत्री सिक्वेरांच्या वक्तव्याचा बाणावलीचे आप आमदार वेंझी व्हिएगस यांनी सिक्वेरांची शाळा घेत त्यांच्यावर टीका केली.
गोव्यात अमली पदार्थ सर्वत्र! गोवा सरकारच्या मंत्र्याचे वादग्रस्त विधान, आपच्या आमदाराने घेतली शाळा
MLA venzy veigas And Minister Aleixo SequeiraDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यात नियोजित सनबर्नवरुन वाद शिगेला गेला असताना राज्य सरकारमधील मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी वादग्रस्त विधान केले आहे. गोव्यात सर्वत्र अमली पदार्थ उपलब्ध आहेत. त्यासाठी सनबर्नची आवश्यकता नाही, असे सिक्वेरा यांनी म्हटले आहे. यावरुन आप आमदार वेंझी व्हिएगस यांनी सिक्वेरांची शाळा घेतली.

'गोव्यात अमली पदार्थ सर्वत्र उपलब्ध आहेत. त्यासाठी सनबर्नची आवश्यकता नाही. याउलट अमली पदार्थ पकडून देण्यासाठी पोलिसांना मदत करुया. पोलिसांनी अधिक सक्रिय होण्याची गरज आहे. शाळकरी मुलांनी अमली पदार्थांपासून दूर राहायला हवे.'

'माझ्या माहितीप्रमाणे उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सनबर्न आयोजकानी थकीत पैसे चुकते केले आहेत. सनबर्नचे पास मिळविण्यासाठी आमदारच मागे लागतात,' असे मंत्री आलेक्स सिक्वेरा म्हणाले.

मंत्री सिक्वेरांच्या या वक्तव्याचा बाणावलीचे आप आमदार वेंझी व्हिएगस यांनी सिक्वेरांची शाळा घेत त्यांच्यावर टीका केली.

गोव्यात अमली पदार्थ सर्वत्र! गोवा सरकारच्या मंत्र्याचे वादग्रस्त विधान, आपच्या आमदाराने घेतली शाळा
अल्पवयीन मुलाला डांबून जीवे मारण्याची धमकी; मुलाच्या आईकडे सात लाखांच्या खंडणीची मागणी

गोव्यात अमली पदार्थ सर्वत्र उपलब्ध आहेत तर त्यावर नियंत्रण ठेवण्याचे ज्यांचे काम आहे त्यांना बदलण्याची गरज आहे. आणि याची सुरुवात तुमच्यापासून करायला हवी, अशा शब्दात आमदार वेंझी व्हिएगस यांनी सिक्वेरा यांच्यावर टीका केली.

दक्षिण गोव्यात नियोजित सनबर्नवरुन राज्यभर राजकारण तापले आहे. यात वेर्णा पठारावर सनबर्न व्हावा यासाठी लोटली पंचायतीने विशेष ग्रामसभा आयोजित केली होती.

दरम्यान, या सभेत देखील सनबर्नला कडाडून विरोध झाला. पण, या ग्रामसभेमागे मंत्री सिक्वेरा यांचा छुपा पाठिंबा असल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर सिक्वेरांनी सनबर्नच केवळ अमली पदार्थासाठी जबाबदार नसल्याचे वक्तव्य केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com