मुळगाव-डिचोलीत गॅरेजमधील दुचाकींना आग लावल्या प्रकरणी डिचोली पोलिसांकडून एकाला अटक. पुढील तपास सुरू. सुत्रांच्या माहितीनुसार आग लावताना इसम मद्यधुंद अवस्थेत होता.
गोव्यात पुढील आठवड्यात सोमवार आणि मंगळवार (२३, २४ सप्टेंबर) मुसळधार पावसाची शक्यता आहे. गोवा हवामान खात्याने याबाबत अंदाज व्यक्त केला आहे.
आप आणि काँग्रेस, दोघांना आपआपली ताकद वाढविण्याचा पूर्ण अधिकार. जरी भविष्यात आघाडी झाली तरी जागा वाटपाचा अधिकार हा हायकमांडकडेच. त्यापूर्वी सर्व मतदारसंघात पक्षाची शक्ती असणं गरजेचं. तरच त्याचा दोघांना फायदा.
अमित पाटकरांचे सर्व मतदारसंघात काँग्रेस वाढविण्याबाबतचे विधान त्याच दृष्टीने असेल. त्यात काही चुकीचं नाही. काँग्रेस डेस्क इंचार्ज माणिकराव ठाकरेंनी गोमन्तक टीव्हीशी बोलताना केले प्रतिपादन.
मोकळ्या जागेत सांडपाणी सोडल्याने गोवा राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून कुंकळ्ळी आयडीसीतील मरीन प्रॉडोक्ट व क्वालीटी फूड या दोन आस्थापनांना काम बंदची नोटीस. 26 सप्टेंबरपर्यंत कार्यालयात उपस्थित राहून आपली बाजू मांडण्याचे दिले आदेश.
दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये ठेवलेल्या दुचाकींना आग लावण्याची घटना उघडकीस आली आहे. मुळगाव येथे शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेत चार दुचाकी जळाल्याने दोन लाखांहून अधिक रूपयांचे नुकसान झाले आहे. तक्रारीनंतर पोलीस तपास सुरु.
मुख्यमंत्र्यांचे सर्व पंचायतींना स्वच्छता मोहीम करण्याचे आवाहन केले आहे. एक ऑक्टोबरपासून 'एक साथ एक तास' हा उपक्रम नगरपालिका आणि पंचायतींमध्ये राबविण्यात येणार आहे. 2 ऑक्टोबरपूर्वी घरोघरी जाऊन कचरा गोळा केला जाईल.
ओल्ड गोवा येथे झालेल्या दुचाकीच्या अपघातात विवेक कुमार (१७, ओल्ड गोवा) याचा उपचारादरम्यान मृत्यू. विवेकच्या भरधाव दुचाकीने ज्येष्ठ नागिकाला दिलेल्या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले होते. दोघांवर रुग्णालायात उपचार सुरु होते. दरम्यान, उपचारादरम्यान विवेकचा मृत्यू झाला आहे.
वाळपई म्हाऊस जंक्शनच्या मुख्य रस्त्यावर पाण्याची मुख्य पाइपलाइन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया. दुरूस्ती काम करण्यासाठी कामगार हजर
गोव्यातील पहिल्या ग्राम न्यायालयाचे वाळपईत उद्घाटन करण्यात आले आहे. नागरिकांना गाव पातळीवरच न्याय मिळावा, यासाठी ग्राम न्यायालयाची स्थापना करण्यात आली असल्याचे प्रतिपादन ग्राम न्यायालयाचे न्यायमूर्ती इरशाद आगा यांनी वाळपई येथे जिल्हा व सत्र न्यायालय उत्तर गोवा तर्फे ग्राम न्यायालयाचा उद्घाटन सोहळ्यात बोलताना केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.