गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Breaking News Live Update: संत फ्रान्सिस झेवियर डिएनए चाचणी वाद, सुभाष वेलिंगकरांच्या अटकेची मागणी, नवरात्रोत्सव, पर्यटन यासह राज्यात विविध क्षेत्रात घडणाऱ्या ताज्या बातम्या.
गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या
DeadbodyDainik Gomantak
Published on
Updated on

बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

सुभाष वेलींगकरांच्या मागावर पोलिस पथके. बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा पणजी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज.

काकोडा कुडचडे येथील 76 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

काकोडा कुडचडे येथील ज्येष्ठ नागरिक अनिल माड कामत 76 वर्षीय यांनी घराच्या मागे विहिरीत उडी मारून आत्महत्या, कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार मागच्या काही दिवसापासून त्यांची तब्येत बिघडली होती. त्यांच्याच घराच्या मागच्या विहिरीच्या बाजूला त्यांची चप्पल टॉवेल

त्यांच्या कुटुंबियांना आढळल्याने त्यांना याबद्दल संशय आल्याने त्यानी याबद्दल कुडचडे पोलिसांना कळविले, कुटुंबीयाच्या म्हणण्यानुसार मागच्या काही दिवसापासून तब्येत ठीक नव्हती.

सुभाष वेलिंगकर बेपत्ता? मंत्री आलेक्स म्हणतात पोलिस वेलिंगकरांच्या शोधात.

सुभाष वेलिंगकरांना 100 टक्के अटक करण्यात येईल. सध्या ते कुठे लपलेत याची माहिती मिळताच पोलिस त्यांना अटक करतील. मुख्यमंत्री स्वत: या सर्वावर त्यावर लक्ष ठेऊन आहेत. मी ही मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहे. लोकांना मी आवाहन करतो की सर्वांनी शांतता पाळावी.

गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये आहे. याचा पुराव म्हणजे ओल्ड गोव्यात त्यांच्या दर्शनासाठी येणारी लोकांची संख्या. जर लोकांचा त्यांच्यावर विश्वास नसता तर एवढे लोक त्यांच्या दर्शनासाठी आलेच नसते. मंत्री आलेक्स सिक्वेरांचे विधान.

गोव्यात पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून 'येलो अलर्ट' जारी!

राज्यात पुढील दोन दिवस विजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता. हवामान खात्याकडून 'येलो अलर्ट' जारी.

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या
Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यू असल्याचा कुटुंबियांचा अंदाज!

गिरी येथे घराच्या खोलीत श्रीकांत गडेकर यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. संशयासप्द मृत्यू असल्याचे कुटुंबियांचा अंदाज. पोलिस तपास सुरू.

सुभाष वेलिंगकरांना कुठल्याही क्षणी होणार अटक?

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मला सांगितले आहे की सुभाष वेलिंगकर यांना कुठल्याही क्षणी अटक करण्यात येईल : आमदार डिलायला लोबो

ख्रिस्ती समाजाच्या मोर्चाचा वाहतुकीला फटका; अनेकांची गैरसोय

सुभाष वेलिंगकरांच्या अटकेच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणावर निघालेल्या मोर्चाचा वाहतुकीला फटका बसला आहे. मडगावात अनेकांची गैरसोय झाली असून, काहींना मार्ग बदलावा लागला तर बस किंवा पर्यायी व्यवस्था न मिळाल्याने शालेय विद्यार्थ्यांना आणि स्थानिकांना पायपीट करावी लागली.

DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

आंदोलकांकडून कोलवा सर्कल ब्लॉक. मडगाव, फोंडा, कोलवा, पणजी मार्गाने येणारी वाहतूक वळवली.

वेलिंगकर चौकशीसाठी हाजीर हो!

सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्यावर आक्षेपार्ह विधान करून धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा नोंद केल्यानंतर, डिचोली पोलिसांनी सुभाष वेलिंगकर यांना बीएनएसएस कलम ३५ (३) अंतर्गत चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या
Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

हिंदुत्ववादी संघटनांचे वेलिंगकरांना समर्थन, ख्रिस्ती समाजाकडून अटकेची मागणी; राज्यभरात मोर्चे

सुभाष वेलिंगकरांनी संत फ्रान्सिस झेवियर यांच्या डिएनए चाचणीची मागणी केल्यानंतर ख्रिस्ती समाज त्यांच्या अटकेच्या मागणीवरुन आक्रमक झाला आहे. तर, आता हिंदुवादी संघटनांनी सुभाष वेलिंगकरांना समर्थन देत मोर्चा काढला आहे.

राज्यात विविध ठिकाणी वेलिंगकरांच्या अटकेची मागणी करणारे तसेच समर्थन करणारे मोर्चे निघत आहेत. यामुळे राज्यभरात तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com