Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Goa Viral Video Fact Check: मतेपेक्षा जास्त लोक बोटमध्ये बसल्याने हा अपघात झाल्याचे देखील या व्हिडिओत म्हटले आहे.
Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?
Fact Check Of Viral Boat Sink AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: डिजिटल युगातील सोशल मिडिया हे माध्यम जेवढं फायेदशीर तेवढंच धोकादायक देखील आहे. समाज माध्यमांवर अनेक व्हिडिओ वेगाने व्हायरल होतात, व्हिडिओची सत्यता न पडताळ्याने बऱ्याचवेळा गैरसमज निर्माण होतात.

गोव्यात समुद्रात बोट पलटी होऊन २६ लोकांचा मृत्यू आणि ६४ लोक बेपत्ता झाल्याची बातमी वेगाने व्हायरल होत आहे. यासंबधित एक व्हिडिओ देखील समाज माध्यमांवर व्हायरल होतोय. काय आहे या व्हिडिओ मागील नक्की सत्यता जाणून घेऊया.

व्हायरल व्हिडिओतून काय दावा केलाय?

समुद्रात बोट बुडण्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ गोव्यातील असून, यात २३ लोक मृत्यूमुखी पडले असून, ४० जणांना वाचविण्यात आले आहे.

तर, ६४ जण बेपत्ता असल्याचा दावा करण्यात आला आहे. क्षमतेपेक्षा जास्त लोक बोटमध्ये बसल्याने हा अपघात झाल्याचे देखील या व्हिडिओत म्हटले आहे.

राणा संघा या एक्सवरील अकाऊंटवरुन बोट अपघाताचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?
Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

सत्य काय?

व्हिडिओ पडतानी केली असता अशा प्रकारची गोव्यात घडली नसल्याची माहिती समोर आली आहे. बोट पलटी होऊन २३ लोकांच्या मृत्यूच्या घटनेचा दावा गोवा पोलिस आणि अग्निशमन दलाकडून खोडून काढण्यात आला.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील वृत्तसंस्था रॉयटर्स आणि असोसिएट प्रेसने यासंबधित एक वृत्त प्रसिद्ध केले असून, व्हिडिओ संबधित घटना आफ्रिका खंडातील कांगो येथील असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

रॉयटर्सने 2 ऑक्टोबर रोजी यासंबधित वृत्त प्रसिद्ध केले आहे. यात गव्हर्नरने दिलेल्या माहितीनुसार, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमधील किवू सरोवरात गुरुवारी 278 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली. यात 78 लोकांचा बुडून मृत्यू झाला.

यासंदर्भात माहिती देणारा एक व्हिडिओ मिलेनियल या एक्स अकाऊंटवरुन देखील देण्यात आली आहे.

Associated Press चा व्हिडिओ

असोसिएट प्रेस या वृत्तसंस्थेद्वारे यासंबधित व्हिडिओ त्यांच्या Youtube Channel वर प्रसिद्ध केला आहे. काँगो येथे बोट बुडून ७८ लोक मरण पावल्याचे त्यांनी या वृत्तात म्हटले आहे. ०४ ऑक्टोबर रोजी हा व्हिडिओ त्यांनी प्रसिद्ध केला आहे.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?
St. Francis Xavier: फ्रान्सिस झेवियर यांच्या DNA चाचणी मागणीचा वाद पेटला, माजी मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांत तक्रार

गोवा पोलिसांकडून खुलासा

बोट बुडाल्याचा सोशल मिडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ गोव्यातील असल्याचा दावा केला जात आहे. पण, सत्यता पडताळून पाहिली असता हा व्हिडिओ गोमा, काँगो, आफ्रिका येथील असल्याची माहिती समोर आली आहे.

नागरिकांनी पडताळणी न केलेले व्हिडिओ शेअर करु नये आणि योग्य माहितीवर विश्वास ठेवावा, असे आवाहन गोवा पोलिसांनी केले आहे.

पडताळणीतून समोर आलेल्या माहितीनुसार सोशल मिडियावर व्हायरल होणारा बोट अपघाताचा व्हिडिओ गोव्यातील नसून तो काँगो, आफ्रिका येथील असल्याचे समोर आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com