Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Saint Francis Xavier Old Goa Church: हिंदू रक्षा महाआघाडीच्या सुभाष वेंलिंगकरांनी झेवियरांच्या अवशेषांच्या डिएनए चाचणीची मागणी केल्याने गोव्यात गेल्या दोन दिवसांपासून वाद होत आहे.
संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?
Christian Community Gathered At Margao Police Station demanding Arrest of Subhash VelingkarDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Unit Ex RSS Chief Subhash Velingkar On Saint Francis Xavier DNA Test

पणजी : 'गोंयचो सायब' अशी ओळख असणाऱ्या संत फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाची डिएनए चाचणी करावी, अशी मागणी गोवा आरएसएसचे माजी अध्यक्ष आणि हिंदू रक्षा महाआघाडीचे निमंत्रक सुभाष वेलिंगकरांनी केल्याने दोन दिवसांपासून गोव्यात वाद पेटला आहे.

दहा वर्षातून एकदा होणाऱ्या झेवियर यांचा शव प्रदर्शन सोहळा काही दिवसांवर आला असताना वेलिंगकरांच्या मागणीमुळे राज्यातील संतप्त कॅथलिक समाज रस्त्यावर उतरलाय. राज्यभर कॅथलिक समाजाकडून पोलिस स्थानकावर मोर्चे काढत वेलिंगकराच्या अटकेची केली जातेय.

गोवा मुक्तीसाठी बलिदान दिलेल्यांना अभिवादन आणि आंदरांजली अर्पण करण्यासाठी हिंदू रक्षा महाआघाडीच्या वतीने पणजीतील आझाद मैदानावर कार्यक्रम आयोजित केला होता.

या कार्यक्रमात सुभाष वेलिंगकरांनी संत फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाची डिएनए चाचणी करण्याची मागणी केली.

ओल्ड गोव्यातील बॅसिलिका बॉम जिझस चर्चेमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचे अवशेष ठेवण्यात आले आहेत. येथेच २१ नोव्हेबर पासून सुरु होणाऱ्या अवशेष दर्शन सोहळ्याची तयारी सुरु आहे.

संत फ्रान्सिस झेवियर यांचा जन्म १५०६ रोजी स्पेनमधील एक सधन घरात झाला. पॅरिसमध्ये त्यांनी धर्माचे धडे गिरवले. पोपची संमती मिळाल्यानंतर ७ एप्रिस १५४१ रोजी झेवियर धर्मप्रचारासाठी घराबाहेर पडले. उपलब्ध माहितीनुसार, ६ मे १९४२ रोजी त्यांनी भारताच्या भूमीवर म्हणजेच गोव्यात पाय ठेवले. भारतात येण्यासाठी त्यांना १३ महिने लागले होते.

गोव्यात काहीकाळ थांबल्यानंतर त्यांनी दक्षिण भारताकडे प्रवास करत श्रीलंका गाठली पुढे जपानला भेट दिल्याची नोंद आहे. (St. Francis Xavier History Goa Connection)

१९५२ साली झेवियर पुन्हा गोव्यात आले आणि चीनच्या दिशेने प्रवास सुरु केला. ३ डिसेंबर १५५२ साली वयाच्या ४६ व्या वर्षी सांगचुआन बेटावर झेवियर यांच्या आजारपणामुळे मृत्यू झाला.

झेवियर यांच्या शव स्थलांतराचा चीन बेटावरुन प्रवास सुरु झालेला प्रवास १६ मार्च १५५४ रोजी गोव्यात थांबला. तेव्हापासून गेली साडे चारशे वर्षे झेवियर यांचे शव ओल्ड गोव्यातील बॅसिलिका बॉम जीझस चर्चेमध्ये ठेवण्यात आले.

छत्रपती संभाजी महाराजांच्या गोव्यावरील आक्रमण काळात झेवियर यांना 'गोंयचो सायब' ही पदवी गोमंतकीयांनी बहाल केली.

St. Francis Xavier
St. Francis Xavier Dainik Gomantak
संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?
Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी हिंदू रक्षा महाआघाडीचे निमंत्रक सुभाष वेलिंगकर यांच्या अटकेची मागणी गोव्यातील कॅथलिक समाज करत आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून कॅथलिक समाजातील नागरिक रस्त्यावर उतरुन निदर्शेने करत आहेत. कारवाईची मागणी करत राज्यातील मडगाव, डिचोली, फातोर्डा आणि राजधानी पणजी येथील पोलिस स्थानकांवर नागरिकांनी धडक मोर्चे काढले.

शनिवार वेलिंगकरांच्या अटकेच्या मागणीने जोर धरला असून, संतप्त कॅथलिक समाजाने रस्त्यावर उतरत मडगावातील कोलवा सर्कल येथे गर्दी केली. नागरिकांना मडगावात प्रवेश रोखल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली.

Goa Police At Colva Circle, Margao
Goa Police At Colva Circle, MargaoDainik Gomantak

माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांनी वेलिंगकरांच्या वक्तव्याविरोधात कोलवा पोलिस स्थानकांत तक्रार दाखल केली. त्यापाठोपाठ वॉरन आलेमाव यांनी देखील तक्रार दाखल केली. फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी याप्रकरणी भाष्य करताना सरकारच्या भावना दुखावल्या नाहीत का? असा सवाल उपस्थित केला.

राज्याचे पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी याबाबत सरकार कारवाई करेल, असे आश्वासन दिले. तर, माजी मंत्री नीलेश काब्राल यांनी अशा घटना घडल्या नकोत, अशी प्रतिक्रिया दिली.

हिंदूवादी संघटना देखील सुभाष वेलिंगकरांच्या समर्थनात रस्त्यावर उतरल्या असून, डिएनए चाचणीची मागणी जुनीच असल्याचा दावा केला आहे. संघटनांनी डिचोली पोलिस स्थानकावर मोर्चा काढत वेलिंगकरांसोबत ठाम असल्याचा संदेश दिला. दरम्यान, वेलिंगकरांनी देखील डिएनए चाचणी मागणीवरुन एवढा त्रागा करण्याची गरज का आहे? अशी प्रतिक्रिया दिली आहे.

गोव्यात धार्मिक तेढ निर्माण झाल्याने पोलिस (Goa Police) सध्या अलर्ट मोडवर आहेत. उत्तर ते दक्षिण गोव्यात कॅथलिक समाजाने ठिकठिकाणी मोर्चे काढत सुभाष वेलिंगकरांच्या अटकेची मागणी केली.

गोव्यातील डिचोली पोलिस स्थानकांत आपचे आमदार क्रूझ सिल्वा यांच्या तक्रारीवरुन सुभाष वेलिंगकर यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Effigy of Subhash Velingkar Burnt By Catholic Community
Effigy of Subhash Velingkar Burnt By Catholic Community Dainik Gomantak
संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?
Subhash Velingkar: 'वेलिंकरांना अटक करा, नाहीतर...'; संतप्त जमावाचा सरकारला अल्टिमेटम; डिचोलीत गुन्हा दाखल!

सुभाष वेलिंगकर यांना त्वरीत अटक करावी या मागणीसाठी हजारो कॅथलिक नागरिक विविध ठिकाणी रस्त्यावर उतरले आहेत. पोलिसांकडून देखील वेलिंगकरांना चौकशीसाठी केव्हाही नोटीस बजावली जाऊ शकते. (Who is Subhash Velingkar)

शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांनी सुभाष वेलिंगकरांना केव्हाही अटक होऊ शकते, असे आश्वासन मुख्यमंत्री सावंत यांनी दिल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याप्रकरणी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com