GoaNews: जीप संघटना दूधसागर पर्यटन हंगामाच्या विरोधात ठाम! वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa News: दिवाळी, नरकासुर, पर्यटन, इफ्फीची तयारी, राजकारण यासह गोव्यात दिवसभर घडणाऱ्या ठळक घडामोडी.
जिटीडीसीचे ऑनलाईन काऊन्टर जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत...
Jeep AssociationDainik Gomantak
Published on
Updated on

जीप संघटना दूधसागर पर्यटन हंगामाच्या विरोधात ठाम!

जिटीडीसीचे ऑनलाईन काऊन्टर जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत दूधसागर पर्यटन हंगाम चालू करण्यास आमचा ठाम विरोध असेल, असा जीप असोसिएशनने एकमताने निर्णय घेतला आहे.

मुरगाव नगरपालिकेच्या माजी सभापतींचा समर्थाकांसोबत काँग्रेस प्रवेश!

मुरगाव नगरपालिकेचे माजी सभापती नंदादीप राऊत यांच्यासह दोन नगरसेवक आणि वास्को येथील समर्थकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

हणजूण येथे कंस्ट्रक्शन साइटवरुन पडून पश्चिम बंगालच्या मजूराचा जागीच मृत्यू!

हणजूण येथे कंस्ट्रक्शन साइटवरील दुसऱ्या मजल्यावरुन पडून पश्चिम बंगामधील मजूराचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या मजूराचे नाव नारायण रॉय (वय, वर्ष 35) असे आहे. पोलिसांनी घटनस्थळी पोहोचले असून घटनेचा तपास सुरु केला आहे.

कोलवा समुद्रकिनाऱ्यावर स्वदेश दर्शन अंतर्गत शाश्वत विकास; पर्यटनमंत्री रोहन खवंटे

राज्याचे पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांनी आज (18 ऑक्टोबर) बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस, मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि अधिकाऱ्यांसोबत कोलवा समुद्रकिनाऱ्याची पाहणी केली. स्वदेश दर्शन अंतर्गत 17cr चा पहिला टप्पा 5 जानेवारी 2025 पर्यंत सुरु होऊन तो 6 महिन्यांत पूर्ण होईल. आत्तापर्यंत आम्ही कोणत्याही मच्छीमार बांधवाच्या घराला हात लावलेला नाहीये, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहण खवंटे यांनी दिली.

रस्ते सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेसंबंधी वाळपईत जनजागृती!

रस्ता सुरक्षा व वाहतुक व्यवस्था संबंधी आज (18 ऑक्टोबर) वाळपई नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने सत्तरी मामलेदार व वाळपई पोलिसांतर्फे जनजागृती मोहीम. यावेळी नागरिकांना पत्रके वाटून, हेल्मेट तसेच सिट बेल्टचे महत्व समजवण्यात आले. सत्तरीचे मामलेदार धिरेन बनावलीकर यांच्यासह इतरांची उपस्थिती.

गोव्याने सिक्कीमला 108 धावांत गुंडाळले

रंगपो येथे सुरु असलेल्या रणजी करंडक प्लेट विभाग क्रिकेट सामन्यात गोव्याने सिक्कीमचा पहिला डाव 108 धावांत गुंडाळला.

कुडणेतील ब्लॉक 7 साठी जनसुनावणी सुरु

कुडणे साखळी व सोनशी सत्तरीतील "ब्लॉक 7- कुडणे मिनरल ब्लॉक"च्या पर्यावरणीय दाखल्यासाठी साखळी रवींद्र भवनमध्ये जनसुनावणी. शंभरहून अधिक लोक मांडणार विचार. बहुतेक जणांचे खाण प्रक्रियेला समर्थन.

पर्यटन हंगामाच्या आधी एसडीपीओ यांनी पणजीतील क्रूझ ऑपेटर्ससोबत घेतली बैठक

गोव्यात पर्यटन हंगाम सुरु होण्या आगोदर एसडीपीओ यांनी पणजीतून क्रूझ ऑपरेटर्ससोबत बैठक घेतली. यामध्ये खालील सूचना यावेळी करण्यात आल्या आहेत.

1. त्यांनी नियुक्त केलेल्या क्रू सदस्यांची पडताळणी करणे.

2. सक्षम अधिकाऱ्यांकडून योग्य परवानगी घेणे.

3. 22.00 वाजता साऊंड सिस्टिम बंद करणे.

4. सर्व सुरक्षा उपकरणे ठेवणे.

5. सर्व सुरक्षा उपायांची काळजी घेतली जाते याची पाहणी करणे.

6. तिकीट काढण्यासाठी 6 कर्मचाऱ्यांची नोंदणी पर्यटन विभागाकडे अनिवार्यपणे केली जाणार आहे.

7. ग्राहकांकडे विशेष लक्ष देणे.

8. पर्यटकांना कोणताही अनुचित त्रास होणार नाही हे पाहणे.

9. पास/तिकीट जारी करणे.

उत्तरोदा-माजोर्डा येथे वर्षातून तीन वेळा समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते: ॲलेक्स सिक्वेरा

दरवर्षी जुलै, ऑक्टोबर आणि डिसेंबर महिन्यात उत्तरोदा-माजोर्डा येथे समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते. ही एक सामान्य नैसर्गिक घटना आहे. किनारपट्टीचा अभ्यास करण्यासाठी गोवा सरकारने चेन्नईहून एनसीएससीएमची नियुक्ती केली आहे, त्यांनी उत्तरोदा समुद्रकिनाऱ्यापासून सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी आधीच क्षेत्रीय सर्वेक्षण केले असून आज ते क्षेत्रीय अभ्यासासाठी आले आहेत. एक आठवडा ते येथे असतील.

राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील करासवाडा येथील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

करासवाडा येथे राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. म्हापसा पालिकेच्या वतीने ही कारवाई करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com