
काणकोण येथील सत्यवती आंगले उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षिका चंद्रलेखा मेस्त्री यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर.
माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली काणकोण मधील विविध शासकीय विभागांच्या तालुका प्रमुखांची बैठक झाली. यावेळी विभागीय इमारतींच्या स्थितीचा आढावा घेतला. त्यांनी काही विभागांना पर्यायी जागेत स्थलांतरित करण्याचे निर्देश दिले. काणकोण येथे एक प्रशस्त, सर्वसमावेशक तालुका प्रशासकीय इमारतीचे बांधकाम विचाराधीन आहे आणि प्रशासनात प्रवेश सुलभ करण्यासाठी ते लवकरच सुरु केले जाईल असे मुख्यंत्र्यांनी सांगितले.
CLINICAL ESTABLISHMENT ACT कायद्यात करणार बदल. 15 सप्टेंबरपूर्वी काढणार अध्यादेश. राज्यातील सरकारी आनी खाजगी डॉक्टरांची सुरक्षा लक्षात घेऊन हा बदल करण्यात येणात आहे.
माजी भारतीय क्रिकेटर प्रग्यान ओझा याने नुकतेच गोव्याला भेट दिली. यावेळी त्याने गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधन पिल्लई यांची भेट घेतली.
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, समाजकार्यकर्ते भैयासाहेब देसाई (९२, मूळचे तुये व पर्वरी येथील रहिवासी) यांचे आज अल्प आजाराने निधन झाले. मराठी भाषा आणि संस्कृतीचे खंदे समर्थक अशी त्यांची ओळख होती. त्यांचे पार्थिव पर्वरी येथे दुपारी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
त्यांनी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार देह गोमेकॉला दान करण्यात आला. त्यांच्या पार्थिवाचे अनेक मान्यवरांनी दर्शन घेतले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धाजंली वाहिली.
दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाने केनियन नागरिक मायका गुंबी याला एनडीपीएस कायद्यांतर्गत दोषी ठरवले आहे. गुंबीला २०१७ साली पाळोळे - काणकोण येथे अडीच लाखांचा गांजा बाळगल्याप्रकरणी अटक केली होती.
हडफडे येथील सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये चोरी तसेच धुळेर-म्हापसा येथील सेंट अँथनी हायस्कूलच्या मालमत्तेची नासधूस करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला पोलिसांनी केली अटक. संशयितांकडून चोरीचा मुद्देमाल केला हस्तगत.
गोव्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला असून, दोन्ही जिल्ह्यात जोरदार सरी बरसण्याची शक्यता आहे.
बाणावलीचे माजी आमदार आणि माजी क्रिडा मंत्री मोंत क्रुझ यांचे निधन. मंत्रीपदाच्या काळात क्रुझ यांनी विक्रमी १८० दिवसात फातोर्डा नेहरु स्टेडीयमची उभारणी केली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.