Amit Palekar: अटक टाळण्यासाठी आप नेते अमित पालेकरांची धडपड, उच्च न्यायालयात घेतली धाव

Banastarim Mercedes crash case: अमित पालेकरांनी फ्रान्सला जाण्यासाठी परवानगी घेतली होती. पण, इतर देशांमध्ये जाण्यासाठी परवानगी घेतली नव्हती.
Amit Palekar: अटक टाळण्यासाठी आप नेते अमित पालेकरांची धडपड, उच्च न्यायालयात घेतली धाव
AAP Goa | Amit PalekarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: बाणस्तारी अपघात प्रकरणातील संशयित आप नेते अमित पालेकरांचा जामीन फोंडा अतिरिक्त सत्र न्यायालयाने रद्द केला. जामीन रद्द केल्यानंतर गुन्हे शाखेकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. पालेकरांचा त्यांच्या घरी शोध घेतला असता ते सापडले नाहीत. पालेकर अटक टाळण्यासाठी प्रयत्न करत असून, त्यांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

अमित पालेकरांनी फ्रान्सला जाण्यासाठी परवानगी घेतली होती. पण, इतर देशांमध्ये जाण्यासाठी परवानगी घेतली नव्हती. कोणत्या देशात जाणार त्याची माहिती दिलेली नव्हती. पालेकरांच्या हालचालींवर न्यायालय आणि पोलिसांना लक्ष ठेवणे शक्य झाले असते, पण त्यांनी अटींचे उल्लंघन केले असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे अमित पालेकर यांच्या वकिलाने म्हटले होते. त्यानुसार अमित पालेकरांनी जामीन रद्द केल्याच्या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

अमित पालेकरांनी उच्च न्यायालयात दिलेल्या आव्हानावर उद्या (२८ ऑगस्ट) सुनावणी होणार आहे. दुसरीकडे गुन्हे शाखेचे पोलिस सोमवारपासून पालेकरांचा शोध घेत आहेत.

Amit Palekar: अटक टाळण्यासाठी आप नेते अमित पालेकरांची धडपड, उच्च न्यायालयात घेतली धाव
Banastarim Accident Case: आप नेते अमित पालेकर फरार? जामीन रद्द झाल्यानंतर अटकेची टांगती तलवार, गुन्हे शाखेकडून शोध

जामीन रद्द प्रकरण काय?

1) पालेकर यांनी फ्रान्सला कुटुंबासमवेत जाण्यासाठी अर्ज केला होता. त्यासंदर्भातचे पुरावेही अर्जासोबत जोडले होते.

2) त्यानंतर त्यांनी थायलंड, दुबई, थायलंड व हाँगकॉँग येथे २५ जानेवारी २०२४ ते २९ मे २०२४ दरम्यान देशाबाहेर प्रवास केला होता. त्यांच्या प्रवासासंदर्भातची माहिती पुरविली नव्हती.

3) त्यांना जर जामिनातील अटी अडचणीच्या वाटत होत्या, तर त्यांनी त्यात सुधारणा करण्यासाठी अर्ज करून न्यायालयाकडून परवानगी घ्यायला हवी होती.

4) मात्र, त्यांनी ते केले नाही. फ्रान्सप्रमाणे इतर देशांची नावे न्यायालयाला देणे आवश्‍यक होते, त्यामुळे या देशांना भेट देणे किंवा नाही ते न्यायालय ठरवू शकले असते, असे न्यायाधीशांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com