सरकारी नोकरी देण्याच्या नावाखाली महिलेला 15 लाखांचा गंडा, साखळीत क्रिकेट खेळपट्टीवर गवा; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Breaking News Live Update: गोव्यातील कला - क्रीडा - संस्कृती, गुन्हे, राजकारण, पर्यटन यासह विविध क्षेत्रातील बातम्यांचा आढावा.
Goa Today's News Live: सरकारी नोकरी देण्याच्या नावाखाली 15 लाखांची फसवणूक; एकास अटक
Fraud caseDainik Gomantak
Published on
Updated on

सरकारी नोकरी देण्याच्या नावाखाली 15 लाखांची फसवणूक; एकास अटक

उसगांव येथील एका महिलेला सरकारी नोकरी देतो म्हणून १५ लाख रुपयाची फसवणुक केल्याप्रकरणी फोंडा कुर्टी येथील सागर नाईक याच्यावर ४२० कलमाखाली गुन्हा नोंद.फोंडा पोलिस कडुन तपास चालु.

मुस्लिमवाडा-डिचोली येथे दुचाकीचा अपघात, युवक थोडक्यात बचावला

मुस्लिमवाडा-डिचोली येथे दुचाकीचा अपघात. मंगळवारी दुपारी झालेल्या अपघातात दुचाकी चालक व्हॅनला धडकून किरकोळ जखमी.

पाळीत गवारेडा चक्क क्रिकेट खेळपट्टीवर

साखळी मतदारसंघातील पाळी व सुर्ल या गावात सध्या गव्यारेड्यांचा मुक्त संचार वाढला आहे. पाळीत चक्क एका मैदानाच्या खेळपट्टीजवळून एक गवारेडा जाताना अनेकांनी पाहिला. त्यामुळे या भागात भितीचे वातावरण पसरले आहे.

गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाच्या मेगा नोकर भरतीत फिक्सींगचा आरोप, 6,000 अर्ज गायब!

गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाची मेगा नोकरभरती प्रक्रिया वादात. 944 पदांसाठीच्या मेगा नोकरभरतीचे अनुक्रमांक 1 ते 6000 क्रमांकापर्यंतचे 6 हजार अर्ज गायब.

आम आदमी पक्षाच्या अॅड. अमित पालेकरांचा आरोप. हे अर्ज आमदार मंत्र्यांनी आधीच आपआपल्या उमेदवारांना देऊन नोकऱ्यांचे फिक्सींग केल्याचाही गंभीर आरोप.

दोतोर सावंत 'भिवपाची गरज ना', सोशल मिडीयावर मोहीम जोरात‌!

शहा, नड्डा यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री सावंत आणि मंत्री राणे यांच्यातील बंद दाराआड झालेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे समर्थक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची सोशल मिडीयावर 'भिवपाची गरज ना' मोहिमेला जोर.

गोवा समाज कल्याण खाते ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरु करणार Help Line

गोवा समाज कल्याण खात्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी Help Line सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत एका खासगी संस्थेशी करार करण्यात आला असून, लवकरच ही हेल्प लाईन सुरु होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर गोवा पोलिस Action Mode मध्ये, भाडेकरु पडताळणीस प्रारंभ

राज्यात वाढत्या गुन्ह्यांचे प्रमाण लक्षात घेता गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत Action Mode मध्ये असून, विविध ठिकाणी भाडेकरु पडताळणीस प्रारंभ झाला आहे. वाळपई पोलिसांच्या वतीने होंडा सत्तरीत भाडेकरुंची पडताळणी करण्यात आली. यावेळी ७० भाडेकरुंची तपासणी पूर्ण झाली.

Goa Government Job:...यापुढे गोव्यात आयोगाऐवजी खात्यांतर्गत नोकरभरतीलाच प्राधान्य

राज्यात यापुढे नोकर भरती आयोगाऐवजी खात्यांतर्गत नोकरभरतीलाच प्राधान्य. मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि मंत्री राणे यांच्यासोबतच्या बैठकीत अमित शहा, जे. पी नड्डा आणि बी.एल संतोष यांच्या उपस्थितीत शिक्कामोर्तब.

नोकरभरती ऐवजी खात्यांतर्गत नोकरभरतीसाठी मंत्री राणेंनी आक्रमक भूमिका मांडल्याची सुत्रांची माहिती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com