Goa Today's News Wrap: लोकसभा निवडणूक, गुन्हे, पर्यटन विश्वातील ठळक घडमोडींचा आढावा

Goa Today's 09 April 2024 Live News Update: गोव्यातील क्रीडा, राजकारण, पर्यटन, संस्कृती आणि विविध क्षेत्रातील ठळक घडामोडींचा आढावा.
Goa Today's Live News
Goa Today's Live News
Published on
Updated on

आमची सरळ लढत भाजप सोबत - मनोज परब

सध्याच्या लोकसभा निवडणुकीत आरजी ची सरळ लढत भाजप सोबत आहे. त्यांच्याकडे सर्व प्रकारची शक्ती असली तरीही जनता ही आमच्यासोबतच आहे आणि येणारी निवडणूक आम्ही नक्की जिंकू असा विश्वास आरजीच्या मनोज परब यांनी पत्रकार परिषदेत केला.

रुद्रेश्वर देवस्थान भंडारी समाजाचेच

हरवळेतील रुद्रेश्वर देवस्थान प्रकरणी यापुढे हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही. डिचोली तालुका भंडारी समाज समितीचा निर्धार. रुद्रेश्वर देवस्थान भंडारी समाजाचेच असल्याचा पुनःरूच्चार.

रमाकांत खलप हे पक्षबदलू आहेत - मनोज परब

रमाकांत खलप यांना कॉंग्रेस ची टिकीट भाजपाने सेटिंग करून दिलेली आहे. जर त्यांच्यामध्ये जिंकण्याची ताकद आहे तर त्यांना टिकीट द्यायला कॉंग्रेस ला येवढा वेळ का लागला असे प्रश्न मनोज परब यांनी पत्रकार परिषदेत केली.

मुलाखत देण्याआधी विरियातो यांनी अभ्यास करावा - मनोज परब

जर ही निवडणूक फक्त राष्ट्रीय पक्षाची असेल तर इंडिया अलायन्स ने स्थानिक पक्षांना सोबत घेऊन लोकसभा निवडणूक का लढवतायेत.

कॅप्टन विरीयातो फर्नांडिस यांनी मुलाखत देण्याआधी व्यवस्थित अभ्यास करावा असा टोला आरजी पक्षाचे उत्तर गोवा लोकसभा उमेदवार मनोज परब यांनी पत्रकार परिषदेत केला.

यंदा पाऊस राहणार सामान्य !

Monsoon 2024

हवामान अंदाज एजन्सी स्कायमेटने मंगळवारी मान्सूनचा अंदाज जाहीर केला. 'स्कायमेट'च्या मते २०२४मध्ये मान्सून सामान्य असेल. एजन्सीने मान्सून हंगाम १०२% (५% अधिक-वजा) असण्याचा अंदाज वर्तवला आहे.

जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळी हंगामातील सरासरी ८६८.६ मिमी आहे. 'स्कायमेट'चे व्यवस्थापकीय संचालक जतिन सिंग यांनी सांगितले की, सुरुवातीला अल निनोचा प्रभाव जाणवेल; परंतु नंतर त्याची भरपाई होईल.

स्कायमेटच्या मते, देशाच्या दक्षिण, पश्चिम आणि उत्तर-पश्चिम भागात चांगला पाऊस अपेक्षित आहे.

काँग्रेसच्या लोकसभा प्रचाराला इच्छुकांची दांडी

काँग्रेसने आज गोव्यात लोकसभा प्रचाराचा शुभारंभ केला. प्रचाराच्या पहिल्याच दिवशी खासदार फ्रान्सिस सार्दिन, गिरीश चोडणकर आणि विजय भिके यांनी दांडी मारली.

सत्तरीत आढलेल्या दुर्मिळ ग्रे स्लेंडर लॉरीसला सुखरुप सोडले जंगलात

सत्तरीत मानवी वस्तीत आढळून आलेल्या ग्रे स्लेंडर लॉरीस (वनमानव) याला सुखरुप जंगलात सोडण्यात आले.

Gray Slender Loris
Gray Slender LorisDainik Gomantak

नानोडा-दोडामार्ग येथे अपघात; महिलेसह तिघेजण जखमी

Nanoda Dodamarg Accident

नानोडा-दोडामार्ग रस्त्यावर दुचाकी आणि कारमध्ये अपघातात, महिलेसह तिघेजण जखमी. दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात कार दरीत.

Accident
AccidentDainik Gomantak

खोर्लीत फॅक्टरीला आग, अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण

मिनेजेस कामको फुड प्रा. लि. खोर्ली येथील फॅक्टरीला आग. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण, मालमत्ता नुकसान झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

चिवार, हणजुणे येथे रेंट कारचा अपघात

Goa Accident

चिवार, हणजुणे येथे रेंट कारचा अपघात झाला असून, कारने वीज खांबाला धडक दिली. अपघातात कोणीही जखमी झाले नाही पण, कारच्या समोरच्या भागाचे नुकसान झाले आहे.

Goa Accident
Goa AccidentDainik Gomantak

बिजेपीका बस हो गया, इस बार इंडिया सरकार! - विरोधी पक्षनेते युरी आलेमाव

BJP का बस हो गया, इस बार इंडिया सरकार! अशा शब्दात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी भाजपला टोला लगावला आहे. काँग्रेस आज लोकसभा प्रचाराचा शुभारंभ करत असून, सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पणजी ते पत्रादेवी एकत्र बस प्रवास केला.

सुसंस्कार व सुआरोग्याची गुढी उभारूया - मुख्यमंत्री

Gudi Padwa In Goa

साखळीत नववर्षाचे भक्तीपूर्ण वातावरणात स्वागत. गुढीपाडव्यानिमित्त आयोजित शोभायात्रेत मुख्यमंत्र्यांचा सहभाग. नवीन वर्षारंभी सर्वांनी सुसंस्कार व सुआरोग्याची गुढी उभारून जिवनात बदल घडवूया अशा शुभेच्छा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी दिल्या.

CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak

प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर के. आतिश यांचे गोव्यात राहत्या घरी निधन

Cinematographer K. Atish Passed Away

प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर के. आतिश यांचे गोव्यात मडगाव येथील राहत्या घरी निधन झाले. काही दिवसापूर्वी गोव्यात आले असता त्यांना श्वासनाचा त्रास होऊ लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

रुग्णालयातून परतल्यानंतर मडगाव येथील राहत्या घरी त्यांचा मृत्यू झाला. के. आतिश प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर के. वैकुंठ यांचे ज्येष्ठ पुत्र होत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com