Goa Today's News: विश्वास ठेवा, योग्य तापासाबाबत आम्ही कटिबद्ध आहोत - DGP

Goa Today's 25 June 2024 Live News: गोव्याचे खासदार शपथबद्ध, राज्यातील गुन्हे, राजकारण, क्रीडा यासह विविध क्षेत्रातील ताज्या बातम्या.
DGP Jaspal Singh
DGP Jaspal SinghDainik Gomantak

विश्वास ठेवा, योग्य तापासाबाबत आम्ही कटिबद्ध आहोत - DGP

"नागरिकांनी गोवा पोलिसांवर विश्वास ठेवावा. हणजूण पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या आसगाव येथील घर मोडतोड प्रकरणी पोलिस काम करत आहेत. पोलिसांच्या टीम इतर शहरात देखील पाठविण्यात आल्या आहेत. प्रकरण योग्य निष्कर्षापर्यंत घेऊन जाण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत." - DGP जसपास सिंग

शिरगाव सरपंच आणि उपसरपंच विरोधात अविश्वास ठराव

मये मतदारसंघातील शिरगाव पंचायतीच्या सरपंच सौ. करिश्मा गावकर आणि उपसरपंच जयंत गावकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव. पाच सदस्यीय पंचायतीच्या तीन पंचसदस्यांनी केलीय ठरावावर सही. गटविकास अधिकाऱ्यांना ठराव सादर.

आसगाव घर मोडतोड प्रकरण; काँग्रेसचे भाजपा सरकारला अल्टिमेटम

आसगावातील घर मोडतोड प्रकरणातील मुख्य संशयित पूजा शर्मा आणि दोन गुंडांना उद्यापर्यंत अटक करा. अन्यथा रस्त्यावर उतरू, काँग्रेसचे भाजपा सरकारला अल्टिमेटम.

एक्झिट योजनेमुळे नोकरीच्या संधी उपलब्ध होणार - मुख्यमंत्री

Goa IDC Exit Support Scheme मुळे राज्यातील जवळपास १२,७५,००० चौरस मीटर जमीन पुन्हा उद्योग व्यवसायासाठी वापरली जाणार. त्यामुळे विविध नोकरीच्या संधी गोवेकरांसाठी उपलब्ध होतील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

IDC वीज समस्या, अंतर्गत विजवाहिण्या घालणार - मुख्यमंत्री

औद्योगिक वसाहतींमधील वीज समस्या सोडविण्यासाठी अंतर्गत विजवाहिण्या घालणार. पुढील दिड वर्षांत हे काम पूर्ण होणार, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.

High Tide Alert in Goa: गोव्यात 'हाय टाईड'चा इशारा

इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस (INCOIS Hyderabad) हैद्राबाद यांच्यावतीने गोव्यात हाट टाईडचा इशारा देण्यात आला आहे. याकाळात बोट पाण्यात न घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Asgaon Goa: घर पाडण्यासह पितापुत्राचे अपहरण; जेसीबी चालक, रिअल इस्टेट एजंटला अटक

आसगाव येथे प्रदीप आगरवाडेकर यांचे घर पाडण्यासह पितापुत्राचे अपहरण केल्याप्रकरणी जेसीबी चालक प्रदीप राणा (38, कांदोळी) आणि रिअल इस्टेट एजंट अर्शद ख्वाजा (51, दोना पावला) या दोघांना अटक.

Borim Bridge Loutolim: बोरी पुलाच्या सीमांकनाला लोटली स्थानिकांचा विरोध

नवीन प्रस्तावित बोरी पुलाच्या सीमांकनाला लोटली स्थानिकांचा विरोध. घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात.

Goa Accident: सुकतळी येथे ट्रकला धडकून दुचाकी चालकाचा मृत्यू

सुकतळी येथे रस्त्यावर बंद पडलेल्या अवजड ट्रकला ओला दुचाकीने दिलेल्या धडकेत कुळे येथील दुचाकी चालक तनवेश उल्हास रिवणकर याचा जागीच मृत्यू. मृतदेह शवचिकित्सा करण्यासाठी मडगाव हॉस्पिटलात पाठविला. कुळे पोलिसकडून तपास सुरु.

Goa Accident: दाभाळ येथे अपघात, तिसरीचा विद्यार्थी जखमी

दाभाळ येथे शाळेत जाणाऱ्या तिसरीच्या विध्यार्थ्याला कारची धडक. कार महिला चालवत असल्याचे समोर. जखमी विध्यार्थ्याला उपचारासाठी गोमेकॉत केले दाखल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com