Goa's Top News: अपघात, टॅक्सी चालकाला मारहाण; गोव्यातील ठळक बातम्यांचा आढावा

Goa Today's 18 May 2024 Breaking News: गोव्यातील क्रीडा, गुन्हे, राजकारण, पर्यटन यासह विविध क्षेत्रातील ठळक बातम्यांचा आढावा.
Accident
AccidentDainik Gomantak

महाराष्ट्रातच नव्हे गोव्यातही मोदींचे तोडाफोडीचे राजकारण - खर्गे

नरेंद्र मोदींच्या तोडाफोडीच्या राजकारणाचे महाराष्ट्र हे एकमेव उदाहरण नाही. पीएम मोदींच्या हे राजकारण याआधी कर्नाटक, मणिपूर, गोवा, मध्य प्रदेशात पाहायला मिळाला आहे. त्यांच्या या धोरणाविरुद्ध सर्वजण मिळून लढा देत आहेत, असे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खर्गे म्हणाले.

केजरीवाल यांच्यावर आसामच्या मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

आधी केजरीवाल यांनी दारू घोटाळ्याच्या पैशातून गोवा आणि पंजाबच्या निवडणुका लढवल्या, आता स्वाती मालीवाल यांनी मांडलेल्या मुद्द्यावर केजरीवाल यांचा उजवा हात ओळखले जाणारे संजय सिंह आणि डावा हात म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आतिशी वेगवेगळी विधाने करत आहेत, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा म्हणाले.

तीन लाखांच्या चोरीप्रकरणी महाराष्ट्रातील एकाला अटक

Goa Theft Case

चोरी करुन फरार होण्याच्या बेतात असलेल्या प्रथमेश सायखेडकर (24, नागपूर, महाराष्ट्र) याला थिवी रेल्वे स्थानक येथे कोलवाळ पोलिसांकडून अटक. त्याच्याकडून दोन आयफोन, तीन इतर मोबाईल फोन, घड्याळ आणि दोन एटीएम कार्ड असा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त.

नवीन बोरी पुलाच्या भूसंपादन प्रक्रियेला विरोध

New Borim Bridge

नवीन बोरी पुलाच्या भूसंपादन प्रक्रियेला विरोध करण्यासाठी लोटली येथील शेतकरी व स्थानिक एकवटले.

विकट भगत विरोधात पुन्हा गुन्हा नोंद

कोलवाळ कारागृहाचे अधीक्षक शंकर गावकर यांना धमकी दिल्याप्रकरणी कैदी विकट भगत विरोधात गुन्हा नोंद. ब्रिटिश-आयरिश पर्यटक तरूणी डॅनिएल मॅक्लॉफिन हिचा 2017 मध्ये गोव्यातील काणकोण येथे बलात्कार करून खून करण्यात आला होता. याप्रकरणी विकट भगत अटकेत आहे.

मुष्टिफंड शाळेला कारणे दाखवा नोटीस

अ‍ॅड. सावियो ब्रागांझा यांच्या तक्रारीवरुन कुजीरा येथील मुष्टिफंड शाळेला कारणे दाखवा नोटीस. अतिरिक्त शुल्क घेतल्याप्रकरणी सात दिवसात उत्तर देण्याचे शिक्षण खात्याचे आदेश.

Highschool
HighschoolDainik Gomantak

मडगाव येथे अपघातात एक ठार, एक जखमी

Margao Accident

मडगाव येथे पिकअप ट्रकच्या अपघातात कुयरो वेळीप जागीच ठार तर, दीपक गांवकर गंभीर जखमी. पहाटे तीनच्या सुमारास होलसेल मच्छी मार्केटजवळ झाला अपघात.

Margao Accident
Margao AccidentDainik Gomantak

कळंगुट येथे टॅक्सी चालकाला पर्यटकांकडून मारहाण

Calangute Assault Case

टॅक्सी चालक शैलेश शेटगांवकर (32, साळगाव) याला कळंगुट येथे 11 पर्यटकांकडून मारहाण. शैलेश आपल्या घरी जात असताना साळगाव रोडवर घडला प्रकार.

Calangute Assault Case
Calangute Assault CaseDainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com