व्होर्कोटो सांगे येथे माड कोसळून 3 वीज खांबांचे नुकसान. वीज खंडीत. सुदैवाने जिवीतहानी टळली.
आसगांव घर मोडतोड प्रकरणात वादग्रस्त डीजीपी जसपाल सिंग यांची कोणत्याही क्षणी बदलीचा आदेश शक्य. डीजीपी सिंग दिल्लीला रवाना.
डिचोली शहर कचरा अन् प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प. बुधवारी सायंकाळी झालेल्या पालिका मंडळ आणि स्वच्छतादूतांच्या बैठकीत निर्धार. प्लास्टिक वापरणाऱ्यां विरोधात कडक कारवाई आणि दंडाची रक्कम वाढवण्याचे पालिकेचे संकेत.
मंत्री सुभाष फळदेसाई व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सुळकर्णे येथील रस्त्यावर कोसळलेल्या झाडांच्या फांद्या हटवून रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत केला.
जमिनीच्या 'सर्व्हे'वरुन म्हावळींगे गावात तणाव. लपवून सुरु असलेले भू-सर्व्हेक्षण काम गावकऱ्यांनी रोखले. सर्व्हे करणाऱ्या तिघांनाही पोलिसांनी घेतले ताब्यात. 'आमच्या जमिनी आम्हाला हव्यात', गावकऱ्यांची मागणी.
म्हापसा प्रथम श्रेणी न्यायालयाकडून अहमद देवडी खून प्रकरणातील आरोपी अभिषेक पुजारी आणि मंथन च्यारी यांचा जामीन अर्ज फेटाळला.
नारायण उर्फ बाबू उत्तम भालेकर (33) आणि मुतप्पा उर्फ सनी बगाप्पा निकोडे (34, दोघेही रा. लक्ष्मीनगर हाऊसिंग बोर्ड, म्हापसा, बार्देश) या दोन आरोपींच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ.
लोकांना विश्वासात न घेता गोव्यात अनेक ठीकाणी सुरु असलेले हायवे रुंदीकरण, नव्या बोरी पुलाला शेतकऱ्यांचा असलेला विरोध याबाबत दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन व्हिरीयातोंनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट.
यावर उपायांबाबतही केली चर्चा. गोव्यातील काँग्रेस नेत्यांसह स्थानिकांच्या शिष्टमंडळाला भेटण्यासाठी मागितली वेळ.
अन्साभाट, म्हापसा येथील एका बंद फ्लॅटमध्ये विल्यम्स डिसोझा (62) या व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला.
मडगाव, फातोर्डा येथील कार्यकर्त्यांनी आज (3 जुलै) झाडे तोडल्याप्रकरणी दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन. वनविभागाची परवानगी न घेता झाडे तोडणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदारावर कठोर कारवाईची मागणी. पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याची कार्यकर्त्यांची माहिती.
कोलवा पोलीस उपनिरीक्षक विभिनव शिरोडकर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक सुनीता सावंत यांच्याकडून उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष देसाई यांची नियुक्ती. शिरोडकरांना दक्षिण गोवा मुख्यालयात हजेरी लावण्याचे आदेश.
मडगाव प्रभाग क्रमांक 13 चे नगरसेवक डॉ. सुशांत कुरतरकर यांनी देखील दिला भाजपला राजीनामा. तसेच दिगंबर कामत यांच्यावर मडगावमधील समाजकंटकांना प्रोत्साहन दिल्याचा ठपका. यापूर्वी मडगाव मंडळाचे भाजप सरचिटणीस आणि माजी नगरसेवक केतन कुरतरकर यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
मुख्यमंत्री डॅा. प्रमोद सावंत यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री गंगापुरम किशन रेड्डी यांची भेट घेतली. राज्यातील खाणकामांच्या कामांना वेगवान गती देण्यासाठी त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
मडगाव मंडळाचे भाजप सरचिटणीस आणि माजी नगरसेवक केतन कुडतरकर यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा दिला राजीनामा. आमदार दिगंबर कामत यांच्यावर मडगावकरांबद्दलच्या असंवेदनशीलतेचा ठपका ठेवून भाजप सरकार गोव्यापेक्षा परप्रांतियांना प्राधान्य दिल्याचा केला आरोप.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.