'हात कातरो' खांब अडगळीत, शेफाली वैद्य दु:खित; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Breaking News: गुन्हे, राजकारण, कला-क्रीडा-संस्कृती, पर्यटन, मान्सून यासह विविध क्षेत्रातील ठळक बातम्या.
'हात कातरो' खांब अडगळीत, शेफाली वैद्य दु:खित; गोव्यातील ठळक बातम्या
Shefali VaidyaDainik Gomantak
Published on
Updated on

'हात कातरो' खांब अडगळीत, शेफाली वैद्य दु:खित

ऐतिहासिक 'हात कातरो' खांबाच्या दुरावस्थेवर हिंदूत्ववादी नेत्या आणि वक्त्या शेफाली वैद्य यांनी व्यक्त केली खंत. 'गोव्यातील धर्मांतर, कथा आणि व्यथा' या अनुवादीत पुस्तक प्रकाशनाला वैद्य प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या.

अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी थिवीत केरळच्या एकाला अटक

अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी थिवी येथील रेल्वे पोलिसा आणि नार्कोसच्या वतीने केरळच्या एकास अटक करण्यात आली. त्याच्याकडून तीन लाख किमतीचे 883.68 ग्रॅम चरस जप्त करण्यात आले.

केळशी सरपंच, टॅक्सी चालकांकडून 'निजामी टूर्स'विरोधात पोलिस तक्रार

विना परवाना सुरु असणाऱ्या 'निजामी टूर्स'विरोधात केळशी सरपंच आणि स्थानिक टॅक्सी चालक आक्रमक. कोलवा पोलिसांत तक्रार. स्थानिक व्यवसायांच्या रक्षणासाठी त्वरित कारवाईची मागणी.

डोंगर कापणीचे वृत्तांकन करणाऱ्या पत्रकाराला मिळाली 'बक्षीस'

धारबांदोड्यातील बेकायदेशीर डोंगर कापणी आणि वृक्षतोडीचे वृत्तांकन करणाऱ्या गोमंतकचे पत्रकार एकनाथ खेडेकरांना सरकारची बक्षीस. खेडेकरांच्या होमगार्ड पत्नीची कुळेतून तडकाफडकी मडगावात बदली. सरकारच्या ह्या कृत्याचा सर्व थरातून निषेध.

Goa Murder Case: रेहबर खान खून प्रकरण, आरोपीला सशर्त जामीन

रेहबर खान खून प्रकरणातील आरोपी निलेश तुपकर याला म्हापसा न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. सलूनमध्ये काम करणाऱ्या रेहबरचा १६ एप्रिल रोजी पिळर्ण येथे मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांना अटक केली होती यात दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

टीसीपीच्या अधिकाऱ्यांकडून धारखंड सत्तरीतील भूखंडांची पहाणी

मंत्री विश्वजीत राणेंच्या आदेशानंतर टीसीपी अधिकारी पोहोचले धारखंड सत्तरीत. बेकायदेशीर जमीन भूखंडांची केली पहाणी. भूखंड करून कच्चे रस्तेही तयार. Deputy Town planner युगंधराज रेडकर, ओमकार गावस व सुर्यकांत शिंदेंनी केली प्रत्यक्ष पहाणी‌.

Goa Accident: व्हाळशी - डिचोलीत अपघात, युवती जखमी

व्हाळशी-डिचोली येथे खासगी प्रवासी बस आणि आलिशान कारमध्ये अपघात. मंगळवारी सकाळी घडलेल्या या अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली. प्रवासी बसमधील एक युवती मात्र किरकोळ जखमी.

भूतांची देवी मसणदेवीच्या जत्रेचा नार्वेत उत्साह

Masandevi Yatra
Masandevi YatraDainik Gomantak

नार्वेत मसणदेवीच्या जत्रेचा उत्साह. भूतांची देवी म्हणून ओळखण्यात येणाऱ्या नार्वे येथील श्री मसणदेवीच्या जत्रेला भाविकांची उसळली गर्दी. फक्त दिवसाच साजरी होते जत्रा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com