Goa Today News Live: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, सुरक्षा रक्षकाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
Goa Crime NewsDainik Gomantak

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, सुरक्षा रक्षकाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Breaking News Todays Update: गोव्यातील गुन्हे, राजकारण, पर्यटन, क्रीडा-कला-संस्कृती यासह विविध क्षेत्रातील ठळक बातम्या.
Published on

गोव्याचे मुख्यमंत्री तयार असतील, तेव्हा पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी कर्नाटक मुख्यमंत्र्यांना देखील तयार करू; डॉ. अंजली निंबाळकर

गोव्याचे मुख्यमंत्री तयार असतील, तेव्हा पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी कर्नाटक मुख्यमंत्र्यांना देखील तयार करू. तीन नेते भेटून म्हादईचा प्रश्न सोडवू शकतात. आज गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सदस्यांची बैठक घेणार. डॉ. अंजली निंबाळकर यांची माहिती.

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, सुरक्षा रक्षकाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी संशयित सुरक्षा रक्षकाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पिळर्ण येथे सुरक्षा रक्षकाने ११ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती.

गोव्यात आज यलो अलर्ट, मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता

गोव्यात आज मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असून, हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून गोव्या पावसाचा जोर मंदावला असून, चतुर्थीत देखील जोर कमीच राहणार आहे.

बेशिस्त पार्किंग आणि चतुर्थीच्या गर्दीमुळे पणजी बाजारात वहातूक ठप्प

बेशिस्त पार्किंग आणि चतुर्थीच्या गर्दीमुळे पणजी बाजारात वहातूक ठप्प झाली आहे. नागरिकांनी व्यक्त केला संताप.

IPHB ला 24 लाखांचा चुना लावणारा वरिष्ठ लिपीक निलंबित, कर्मचाऱ्यांच्या पगारात अफरातफर

मानसोपचार आणि मानवी वर्तणूक संस्था (IPHB) मधील एका वरिष्ठ लिपिकाला पाच वर्षांच्या कालावधीत कर्मचाऱ्यांच्या पगारातून ₹ 24 लाखांची उधळपट्टी केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे.

ट्रकच्या ड्रायव्हर केबिनला अचानक लागली आग; मोठी दुर्घटना टळली, तीन लाखांचे नुकसान

शांतीनगर, वास्को येथे पार्क करण्यात आलेल्या ट्रकच्या केबिनला अचानक आग लागली. घटनेत तीन लाखांचे नुकसान झाले असून, मोठी दुर्घटना टळली.

फार्मागुडी येथे वाहनाच्या धडकेत दोन गायींचा मृत्यू

फार्मागुडी - ढवळी बायपास मार्गावर वाहनाच्या धडकेत दोन गायींचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अधिक तपास सुरु आहे.

Goa Monsoon 2024: चतुर्थीच्या काळात तुरळक पावसाची शक्यता

राज्यात मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर मंदावला आहे. आज राज्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर, शनिवारपासून पावसाचा जोर मंदावण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने शनिवारपासून दोन दिवस ग्रीन अलर्ट जारी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com